कोल्हेंना त्यांच्याच होमग्राउंडवर धक्का; शिंगणापूरचे कार्यकर्ते पुन्हा काळे गटात दाखल
कोल्हेंना त्यांच्याच होमग्राउंडवर धक्का; शिंगणापूरचे कार्यकर्ते पुन्हा काळे गटात दाखल
कोल्हेंना त्यांच्याच होमग्राउंडवर धक्का; शिंगणापूरचे कार्यकर्ते पुन्हा काळे गटात दाखल
कोपरगाव विजय कापसे दि ७ ऑगस्ट २०२४ :- आ.आशुतोष काळे यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शिंगणापूर येथील कोल्हे गटाचे निष्ठावान कार्यकर्ते अॅड.युवराज कुऱ्हाडे यांनी आ.आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर दोनच दिवसात शिंगणापूरच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत काळे गटात प्रवेश केला असून कोल्हेंना त्यांच्याच होम ग्राउंडवर हा मोठा धक्का मानला जात आहे.
आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघासाठी ३००० कोटी निधी आणल्यामुळे मतदार संघातील सर्वच गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लागले आहेत.यामध्ये शिंगणापूर देखील मागे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी नाही त्यांच्या सोबत राहण्यापेक्षा ज्यांच्याकडे विकासाचे व्हिजन आहे व मागील साडेचार वर्षात ते मतदार संघातील जनतेने अनुभवले देखील आहे. अशा आ. आशुतोष काळे यांच्यासारख्या नेतृत्वाबरोबर राहणे अधिक चांगले या विचारातून शिंगणापूर येथील संजयजी कुऱ्हे, राजेंद्र सोनवणे, हबीबभाई शेख, बबनराव लोणारी, सुभाष लोणारी, जिभाऊ लोणकर व अशोक संवत्सरकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
या सर्व कार्यकर्त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी शिंगणापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.