काळे गट

माजी आमदार कोल्हेंना पाच वर्षात किती योजना समजल्या हे अगोदर विचारा- सर्जेराव घायतडकर

माजी आमदार कोल्हेंना पाच वर्षात किती योजना समजल्या हे अगोदर विचारा- सर्जेराव घायतडकर

माजी आमदार कोल्हेंना पाच वर्षात किती योजना समजल्या हे अगोदर विचारा- सर्जेराव घायतडकर

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ७ ऑगस्ट २०२४ :- कोपरगाव मतदार संघात आ. आशुतोष काळे यांनी आजपर्यंत ३००० कोटीचा निधी आणून विकसित मतदार संघ म्हणून कोपरगावची वेगळी ओळख जिल्ह्यात नव्हे तर राज्यात निर्माण झाली आहे. मात्र अनुकूल परिस्थितीत ज्यांना त्यांच्या कार्यकाळात मतदार संघाचा विकास करता आला नाही,ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी नाही त्यांना त्यांच्या कार्यकाळात किती शासकीय योजना समजल्या हे अगोदर माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना विचारा असा खोचक सल्ला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सर्जेराव घायतडकर यांनी रवंदेच्या विद्यमान उपसरपंचांना दिला आहे.

जाहिरात

रवंदेचे उपसरपंच यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतांना सर्जेराव घायतडकर यांनी असे म्हटले आहे की, लाटेवर निवडून आलेल्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना त्यांच्या कार्यकाळात सत्ताधारी पक्षाच्या आमदार असतांना देखील मतदार संघाचा विकास करता आला नाही. आपली ताकद त्यांनी विविध आंदोलने मोडून काढण्यात खर्ची घातली. याउलट आ. आशुतोष काळे यांनी सत्ताधारी पक्षाचा आमदार व सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले सलोख्याच्या सबंधाचा योग्य वापर करून आजपर्यंत ३००० कोटीचा निधी निधी खेचून आणला असून येणारी विधानसभा निवडणुक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत हा आकडा आणखी वाढणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे जोपर्यंत सत्ता होती त्याची जरी आकडेवारी जुळविली तरी ३००० कोटी होणार नाहीत याचे कोल्हेंना खरे दु:ख आहे.
आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी कशा प्रकारे पाठपुरावा करून निधी मिळविला हे मतदार संघातील जनता जाणून आहे. मात्र ज्यांना त्यांच्या कार्यकाळात विकासाच्या योजना समजल्याच नाहीत त्यामुळे निधी मिळविता न आल्याचे शल्य त्यांना बोचत आहे. जलजीवन मिशन योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांसाठी निधी कसा येतो याची माहिती आहे का? त्याची माहिती घ्या. जल जीवनच्या पाणी पुरवठा योजनांसाठी मिळणारा निधी हा राज्य शासनाचा देखील असतो आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या पाणी योजनांची मागणी त्या त्या तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी करणे गरजेचे असते. मात्र योजनांची माहिती नसणाऱ्या तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या अर्धवट कार्यकर्त्यांना याची माहिती नसल्यामुळे मतदार संघातील जनता त्यांच्याकडे मनोरंजन म्हणून पाहते. ज्यांना आपल्या कार्यकाळात विकास करता आला नाही त्यांना मतदार संघाचा झालेला विकास देखवत नाही व नैराश्याच्या भावनेतून टीका करण्यापेक्षा माजी आमदार स्नेहलता कोल्हेंना किती योजना समजल्या हे अगोदर विचारा म्हणजे तुम्हाला आ. आशुतोष काळे यांच्यावर टीका करण्याची वेळ येणार नाही असे सर्जेराव घायतडकर यांनी म्हटले आहे.

जाहिरात

 महादेव यात्रेची शिल्लक वर्गणी दुसऱ्याच दिवशी बँकेत जमा करण्याची रवंदे गावची मागील पन्नास वर्षापूर्वीची परंपरा आहे. परंतु ज्यांनी मागील  तीन महिन्यापासून वर्गणीची रक्कम जमा केली नाही त्यांनी अगोदर आपली लायकी ओळखावी.अगोदर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गाव सुधारावे,वर्गणी चे पैसे जमा करावे आणि आपली लायकी ओळखून बोलत चलावे असा सल्ला सर्जेराव घायतडकर यांनी रवंदेच्या विद्यमान उपसरपंचांना दिला आहे.

सर्जेराव घायतडकर

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे