पोलीस निरीक्षक व तलाठी परीक्षेत यश मिळविणाऱ्या कोळपेवाडीच्या गुणवंतांचा आ.आशुतोष काळेंनी केला सन्मान
पोलीस निरीक्षक व तलाठी परीक्षेत यश मिळविणाऱ्या कोळपेवाडीच्या गुणवंतांचा आ.आशुतोष काळेंनी केला सन्मान
पोलीस निरीक्षक व तलाठी परीक्षेत यश मिळविणाऱ्या कोळपेवाडीच्या गुणवंतांचा आ.आशुतोष काळेंनी केला सन्मान
कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२४ :- पोलीस निरीक्षक व तलाठी सरळसेवा भरती परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील दोन गुणवंतांनी दैदिप्यमान यश मिळविले असून या गुणवंतांचा आ. आशुतोष काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोळपेवाडी येथील कु. वैशाली अर्जुन शेळके हिने एमपीएससी परीक्षेत यश मिळवून तिची पोलीस निरीक्षक पदावर निवड झाली आहे. तसेच राहुल गोकुळ माळी यांनी देखील सरळसेवा भरती परीक्षेत यश मिळवून त्यांची तलाठीपदी निवड झाली आहे. या गुणवंतांच्या दैदिप्यमान कामगिरीची आ. आशुतोष काळे यांनी दखल घेवून त्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला व त्यांच्या पालकांचे देखील कौतुक करुन या गुणवंतांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी आ. आशुतोष काळे यांनी स्पर्धेच्या युगात शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात सोयी सुविधांचा अभाव असतांना देखील ग्रामीण भागातील विद्यार्थी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवू शकतात हे सर्व सामान्य कुटुंबातील कु. वैशाली शेळके व राहुल माळी यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेवून मतदार संघातील शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी सोयी सुविधांचा फारसा विचार न करता इच्छित यश साध्य करून आपल्या पालकांचे स्वप्न साकार करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, जनार्दन कोळपे, महेश कोळपे, तसेच वैशाली शेळके व राहुल माळी यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.