नागरिकांनी देश एकसंघ ठेवण्याचे काम करावे- महंत रामगिरी महाराजांचे प्रवचनातून आवाहन
नागरिकांनी देश एकसंघ ठेवण्याचे काम करावे-
महंत रामगिरी महाराजांचे प्रवचनातून आवाहन
नागरिकांनी देश एकसंघ ठेवण्याचे काम करावे-
महंत रामगिरी महाराजांचे प्रवचनातून आवाहन
कोपरगाव विजय कापसे दि १२ ऑगस्ट २०२४–समाज एकसंघ नसेल तर देश तुटतो त्यामुळे नागरिकांनी देश एकसंघ ठेवण्याचे काम करावे.धार्मिक संप्रदायामुळे जगात शांतता व सहिष्णुता टिकून आहे. त्यामुळे प्रत्येकाने हिंदू धर्माच्या नीती नियमांचे आचरण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे सुरू असलेल्या गंगागिरी महाराजांच्या १७७ व्या सप्ताहातील प्रवचना चे तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते .
आज देश चालवणारे राज्यकर्ते जर देशामध्ये सहिष्णुता, धार्मिक वातावरण निर्माण करून एकमेकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करत असतील तर तो देश सर्वांगीण विकास करतो. शेजारी असलेल्या बांगलादेशाचे उदाहरण बघतो . जर धर्माचे पतन झाले तर आपला देश बांगलादेश होण्यात वेळ लागणार नाही असेही मत त्यांनी व्यक्त केले .पूर्वी भूल देण्यासाठी क्लोरोफॉर्म चा वापर करायचे .आज रामनामाचा दुःखावरचे औषध म्हणून क्लोरोफॉर्म म्हणून वापर होतो. भगवान नाम रुपी पाहुणा असून अंतकरणांमध्ये कुटुंब देश यांच्या बद्दल प्रेम असणे हीच खरी माणुसकी आहे . गुरु बनविताना त्याची महानता पाहण्यापेक्षा त्याचे कौशल्य पाहूनच गुरु करणे महत्त्वाचे असते. संसाराला दुःखाच्या वेदना होऊ न देणे, भगवंत आनंद, दुःख निवारण करतो. हिंदूंवर ब्रिटिशांनी केलेला अन्याय आपल्या बांधवांनी सहन केला त्यामुळे अन्याय करणारा जेवढा दोषी असतो तेवढाच अन्याय सहन करणारही दोषी असतो. त्यामुळे जर जशास तसे उत्तर दिले नाही तर आपला बांगलादेश होण्यास वेळ होणार वेळ लागणार नाही.
भागवत धर्माला, हिंदू धर्माला काही अविवेकी देशाबद्दल प्रेम नसणारे लोक हिंदू नेत्यांना हिंसाचारी म्हणतात . अविवेकी व्यक्तीच्या हाती सत्ता जाणे हे दुर्दैव आहे त्यामुळे आपण जागरूकपणे लोकप्रतिनिधींची निवड केली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक भाविकांनी साधुसंतांच्या कार्याचा आदर्श घेऊन त्यांच्या त्यागाची भावना जाणली पाहिजे. सर्व वर्गाला एकत्र करण्याचे काम गंगागिरी महाराज यांनी केले. धर्म संस्कृतीची परंपरा जतन करणे हे आपले कर्तव्य असल्याचे मत रामगिरी महाराज यांनी आपल्या प्रवचनातून व्यक्त केले. धर्म संस्कृतीचे जतन करण्यासाठी भजन- कीर्तन, अध्यात्मिक प्रबोधन करणे ही प्रत्येक वारकरी व हरिभक्त परायण व्यक्तीचे कर्तव्य आहे .त्यामुळे देशप्रेम वाढीस लागते. जर समाज एक संघ नसेल तर देश तुटतो याचे उदाहरण आपण वेळोवेळी पाहिले आहे. त्यामुळे प्रत्येकाने सजगतेने अध्यात्मिक आचरण करणे गरजेचे आहे. असेही मत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आ. माणिकराव कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य सिंमीतीनी कोकाटे, हरिभक्त परायण शिवाजी महाराज तळेकर ,सप्ताह समितीचे अध्यक्ष संभाजी जाधव, राजेश गडाख, राजेंद्र गडाख, अरुण थोरात, कैलास थोरात, सागर महाराज घुमरे, कावेरी महाराज घुमरे, राजेंद्र घुमरे, नवनाथ गडाख, काशीकानंदगिरी महाराज, राजेंद्र डुंबरे, सुरेश तुपे, विवेक केदार ,ज्ञानेश्वर मुठाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आजच्या आमटी भाकरीची पंगत सिन्नर तालुक्यातील काही गावे व कोपरगाव राहाता श्रीरामपूर राहुरी संगमनेर गंगापूर वैजापूर निफाड या तालुक्यातील गावातली अनेक गावांनी आजच्या पंक्तीसाठी भाकरी जमा करून आणल्या होत्या आजच्या 50 हजार लिटर आमटीचा खर्च सामाजिक कार्यकर्ते मधुकर पांडू जगताप यांनी केला त्यासाठी त्यांनी चार लाख रुपयांचा निधी सप्ताह समितीकडे सुपूर्द केला यावेळी त्यांचा रामगिरी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी दोन लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली यावेळी कीर्तन प्रवचन राहूटीमध्ये संत दर्शन भजन हे कार्यक्रम सुरू होते या सर्वच ठिकाणी भाविकांचे मोठ्या प्रमाणात गर्दी होती.