रोटरी कोपरगांव सेंट्रलच्या अध्यक्षपदी राकेश काले तर सचिवपदी विशाल आढाव
रोटरी कोपरगांव सेंट्रलच्या अध्यक्षपदी राकेश काले तर सचिवपदी विशाल आढाव
रोटरी कोपरगांव सेंट्रलच्या अध्यक्षपदी राकेश काले तर सचिवपदी विशाल आढाव
कोपरगांव विजय कापसे दि १२ ऑगस्ट २०२४– रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलच्या २०२४-२५ च्या कार्यकाळासाठी अध्यक्षपदी रोटरीयन राकेश काले आणि सचिवपदी रोटरीयन विशाल आढाव यांची फेर निवड सहायक प्रांतपाल रोटरीयन विनोद पाटणी यांच्या मार्गदर्शनाखाली जाहिर करण्यात आली.
नुतन कार्यकारीनीत खजिनदार रो. अमर नरोडे, क्लब ट्रेनर रो. डॉ. विनोद मालकर, पब्लिक इमेज डायरेक्टर रो. प्रकाश जाधव, टी. आर. एफ. डायरेक्टर रो. कुणाल आभाळे, मेंबरशिप डायरेक्टर रो. सनी आव्हाड यांचा समावेश आहे.
रो. डॉ. सुरेश साबु यांनी रोटरीप्रांत ३१३२ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणुन १ जुलै २०२४ पासुन जबाबदारी स्वीकारली आहे.
रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी फेर निवड झाल्यावर रो. काले यांनी वर्षभरात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक , पर्यावरण, आदी क्षेत्रात भरीव कार्य करणार असल्याचे सांगीतले. रोटरीचे मार्गदर्शक सदस्य आणि संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी रो. अमित कोल्हे, आणि विश्वस्त रो. सुमित कोल्हे यांच्यासह विविध मान्यवरांनी नुतन कार्यकारिनीला शुभेच्छा दिल्या आहे. या प्रसंगी सर्व रोटरीयन रोहित वाघ, डॉ. रावसाहेब शेंडगे , विरेश अग्रवाल, विक्रम लोढा, रिंकेश नरोडे, हर्शल दोशी , विशाल मुंदडा, अनुप पटेल, अनुप डागा, डॉ. महेंद्र गवळी, नवनाथ सोमासे, डॉ. इम्राण सय्यद, सुमित पवार, कपिल पवार उपस्थित होते.