रानभाज्या महोत्सवाचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन -आ. आशुतोष काळे
रानभाज्या महोत्सवाचे आ.आशुतोष काळेंच्या हस्ते उद्घाटन -आ. आशुतोष काळे
आ. आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत तहसील कार्यालयात ध्वजारोहण उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑगस्ट २०२४ :- तहसील कार्यालय कोपरगाव येथे भारताचा ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त तहसीलदार महेश सावंत यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित राहून राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी त्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते, नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने आयोजित रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, सध्या श्रावण महिना सुरु असून या दिवसात अन्न पचनक्रिया मंदावत असते त्यामुळे शाकाहारी जेवणाला महत्व दिले जाते. रानभाज्या हा आपल्यासाठी अमुल्य ठेवा आहे.आजच्या युगात प्रत्येकाला फास्ट फूड खायची सवय लागली आहे. रानभाज्यामध्ये जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असून या रानभाज्या जेवणात अत्यंत गरजेच्या आहेत.
रानभाज्या महोत्सवाच्या माध्यमातून याची माहिती तरूण पिढीपर्यंत पोहोचावी हा यामागील कृषी विभागाचा उद्देश असून रानभाज्या महोत्सव वारंवार भरविले पाहिजे. जंगलात, शेतात व शेताच्या बांधावर, माळरानावर नैसर्गिकरित्या बहुगुणी रानभाज्या निसर्गाने दिलेली देणगी असून सुदृढ आरोग्यासाठी रानभाज्यांचे सेवन अत्यंत गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी या महोत्सवात रानभाज्यांच्या तयार करण्यात आलेल्या विविध रानभाज्यांची चव देखील चाखली.