तिडके पाटील विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
तिडके पाटील विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
तिडके पाटील विद्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोपरगाव विजय कापसे दि १६ ऑगस्ट २०२४– कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील रयत शिक्षण संस्थेचे मारुतीराव दगडूजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हर घर तिरंगा कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंदी वातावरणात संपन्न झाला.तिरंगा आपल्या देशाचा अभिमान व सन्मान आहे. आपला राष्ट्रध्वज आपल्यासाठी धैर्याचे व प्रेरणेचे प्रतिक आहे. तिरंगा आपल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो. आपल्या ध्वजाचा अधिक सन्मान करण्यासाठी १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘घरोघरी तिरंगा’ ही मोहीम राबविण्यात आली होती.
या प्रसंगी ढोल ताशांच्या गजरात, लेझीम पथकासह, हर घर तिरंगा-मन मन मे तिरंगा, भारत आमचा प्राण-तिरंगा त्याची शान, जब तक चांद सितारे रहे- तब तक तिरंगा फहराता रहे, भारत मातेचे गीत गाऊ- तिरंगा घरोघरी लावू अशा घोषणा देत गावातून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. लोकांच्या हृदयात देशभक्ती जागृत करणे, आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे हा ‘हर घर घर तिरंगा’ या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे असे विद्यालयाचे प्राचार्य मांडवडे ए. आर. यांनी सांगितले.
१५ ऑगस्ट या दिवशी ७८वा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ढोल ताशांच्या गजरात व लेझीम पथकासह गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. वंदे मातरम. भारत माता की जय. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो या घोषणा देत असमंत उजळून निघाला. या ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण मा.गं.भा. नर्मदाबाई विक्रम चांदगुडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. याप्रसंगी डॉ. मच्छिंद्र बर्डे यांनी स्वातंत्र्याचे तसेच घरोघरी तिरंगा याबाबत महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीचे भान करून दिले. देशाविषयी स्वाभिमान, देशाभिमान बाळगून देशासाठी कार्य करण्याबाबत सूचित केले. मा. सचिनभाऊ चांदगुडे यांनी विद्यार्थ्यांनी प्रामाणिक कष्ट करून अभ्यासात प्रगती करावी, विद्यालयाचे व आपल्या देशाचे नाव उज्वल करावे असा शुभसंदेश याप्रसंगी दिला. याप्रसंगी मॅरेथॉन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दिगंबर कासोदे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ४ शालेय गणवेश व ५० वह्या दिल्या. सुनील जेजुरकर यांनी गरीब विद्यार्थ्यांना ३ शालेय गणवेश दिले. याप्रसंगी मंजूर येथील सौ.ताराबाई छबू पवार यांनी आपल्या जीवाची पर्व न करता, प्रसंगावधान बघून नदीपात्रात खोलवर पाण्यात जाऊन, स्वतःच्या अंगावरील साडी काढून त्यांना आधार देऊन पाण्याच्या बाहेर काढून तिघांचे प्राण वाचविले. जीवदान देणाऱ्या या वीरमातेचा चासनळी येथील मायभूमी सोशल फाउंडेशन यांच्यावतीने ११ हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी मायभूमी सोशल फाउंडेशन चे सर्व सदस्य उपस्थित होते. भास्करभाऊ चांदगुडे, अशोकराव माळी, तुकाराम गाडे, विधाते सर, सिताराम चांदगुडे, सचिन गाडे, चव्हाणके, पवनकुमार चांदगुडे, देविदास कासोदे, कैलास माळी, नानासाहेब बनसोडे, शरद गरुड, कैलास माळी, शामकांत कासार कविता गांगुर्डे, बर्डेताई, आनिता शिंदे, बाळासाहेब पायमोडे, कापसे, प्राचार्य मांडवडे ए.आर. शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ, शालेय व्यवस्थापन विकास समिती, सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील पालक व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुंदर फलकलेखन कलाशिक्षक आडेप पी.व्ही. यांनी केले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोरे आर. के. यांनी केले व शेवटी आभार श्री. पारधे ए. एम. यांनी मानले. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गावित एम. जे ,चंदने पी. आर.,सारबंदे एन. एच, मोमीन आय. ए. के, घोलप पी.बी., शेख आर. एन, खोंडे आर. सी, राऊत एस. एल, माळी एस. एल, बागुल जी. एम, शिळकंदे व्ही. ए, गोडे एस. एम, चौधरी सर, पेटारे ए. बी, काशीद एस. एस, बोरसे सर, सुपेकर जे. डी., कांदळकर व्ही. ए., गाडे मॅडम, कदम टी. ए., चांदगुडे मॅडम, पवार एस. एस, मंडलिक एस. टी., कापसे के. डी. या सर्व सेवकांनी प्रयत्न केले.