निंबंधक कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा धरणे आंदोलन
निंबंधक कार्यालयातील अनागोंदी कारभाराची चौकशी होवून कायदेशीर कारवाई करावी

कोपरगाव विजय कापसे दि ३० एप्रिल २०२५– कोपरगांव तालुका खरेदी विक्री, निबंधक कार्यालयातील गेल्या अनेक वर्षापासुन अनागोंधी कारभार चालु आहे. या कार्यालयात जवळजवळ ९० टक्के कर्मचारी हे बेकायदेशीर कार्यरत आहे.त्यांना कुठलीही शासकीय अधिकारी यांची ऑर्डर नाही किंवा कंत्राटी कर्मचारी असल्याचे नोंद नाही. किंवा मदतनीस म्हणून …. जिल्हाधिकारी यांची परवानगी नाही किंवा शायकीय मानधन दिले जात नाही. परंतु हे कर्मचारी बिन पगारी फुल अधिकारी आहेत हे सर्व लोक निबंधकाच्या मर्जीने खरेदीविकी साठी आलेल्या नागरीकांना फसवून लुटतात. ते नागरीकांकडुन पावतीला पावती घेतात म्हणजे शासनाच्या नियमाप्रमाणे ६ टक्के स्टॅम्प डयुटी असते. ही मंडळी नागरीकांकडुन ६ टक्के निंबधकाला वेगळे दयावे लागतात अशी बतावणी करून नागरिकांकडुन स्टॅम्प डयूटी उकळतात. या प्रकरणात जवळजवळ हे सर्व दस्त लेखनीक सामील करून घेतलेले आहे त्यामुळे आशा तऱ्हेने सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची खातेनिहाय चौकशी होवून जबाबदार अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हावी व विना परवानगी शासकीय कार्यालयात शासकीस दप्तर हाताळणाऱ्या अनाधिकृत कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावे.सदर चौकशी आदेशाचा अहवाल प्रसिद्धीसाठी मिळावा. सदर बाब तातडीने कार्यवाहीत करण्यात यावी अन्यथा २१ मे पासुन तहसिल कार्यालय कोपरगांव समोर धरणे अंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेना शिवसेनेचेवतीने जिल्हा मुद्रांक अधिकारी यांना २८ एप्रिल रोजी निवेदन देत दिला आहे.







