राष्ट्रवादीच्या ‘विकासाच्या दहीहंडी’ला गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी गौतमी पाटील हजेरी लावणार
राष्ट्रवादीच्या ‘विकासाच्या दहीहंडी’ला गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी गौतमी पाटील हजेरी लावणार
राष्ट्रवादीच्या ‘विकासाच्या दहीहंडी’ला गोविंदांचा उत्साह वाढविण्यासाठी गौतमी पाटील हजेरी लावणार
कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑगस्ट २०२४ :- कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवार (दि.२९) रोजी साजऱ्या होणाऱ्या ‘विकासाच्या दहीहंडी’ची आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जय्यत तयारी सुरु असून गोविदांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी दिली आहे.
दरवर्षी कोपरगाव शहरात होणारी राष्ट्रवादीची दहीहंडी प्रसिद्ध असून प्रत्येक वर्षी मुंबई सारख्या शहरात ज्याप्रमाणे दहीहंडी उत्सवाला सिनेकलाकार मोठ्या प्रमाणात हजेरी लावतात. त्याप्रमाणे कोपरगावात देखील दरवर्षी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दहीहंडी उत्सवाला चित्रपट सृष्टीतील कलाकार उपस्थित राहून हजेरी लावत आलेले आहे.
याहीवर्षी गुरुवार (दि.२९) रोजी कोपरगाव शहारातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या दही हंडी उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.आ.आशुतोष काळे यांनी आपल्या कार्यकाळात मतदार संघाच्या विकासासाठी ३००० कोटीचा निधी आणला असून विकसित कोपरगाव म्हणून कोपरगाव मतदार संघाची वेगळी ओळख जिल्ह्यासह राज्यात निर्माण झाली आहे. त्यामुळे यावर्षीची दहीहंडी हि ‘विकासाची दहीहंडी’ असून या दहीहंडी उत्सवाला आ. आशुतोष काळे स्वत: उपस्थित राहणार आहेत. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांसाठी मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आलेली आहे. त्यातच दहीहंडीमध्ये खास आकर्षण म्हणून या ‘विकासाच्या दहीहंडी’ उत्सवाला प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील उपस्थित राहणार असल्यामुळे आजवरच्या दहीहंडी उत्सवाच्या गर्दीचे सर्व विक्रम मोडीत निघणार आहे. कोपरगावात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग असणाऱ्या आपल्या सण उत्सवांपैकी अतिशय आनंद देणाऱ्या या दहीहंडी या उत्सवाचा तरुणाईसह नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन दहीहंडी उत्सव कमिटीचे अध्यक्ष सचिन गवारे यांनी केले आहे