शहापूर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत कोल्हे गटाचा पराभव करून काळे गटाच्या निशा खंडिझोड विजयी
शहापूर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत कोल्हे गटाचा पराभव करून काळे गटाच्या निशा खंडिझोड विजयी
शहापूर ग्रामपंचायत उपसरपंच निवडणुकीत कोल्हे गटाचा पराभव करून काळे गटाच्या निशा खंडिझोड विजयी
कोपरगाव विजय कापसे दि २७ ऑगस्ट २०२४:- कोपरगाव तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीच्या पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाच्या उमेदवाराचा पराभव करून काळे गटाच्या निशा खंडीझोड विजयी झाल्या आहेत.
शहापूर ग्रामपंचायतीचे काळे गटाचे विद्यमान उपसरपंच सागर किसन घारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच सौ.योगिता घारे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणुक नुकतीच पार पडली. शहापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद काळे गटाकडे असून दोन्ही गटाचे मिळून एकून सात सदस्य आहेत. पार पडलेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत कोल्हे गटाचे दत्तात्रय परसराम पाचोरे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु अटीतटीच्या लढतीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले असून काळे गटाच्या निशाताई चंद्रकांत खंडिझोड ह्या विजयी झाल्या आहेत. निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामसेवक सुरेश रहाणे यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित उपसरपंच सौ. निशा खंडीझोड यांचे मा.आ.अशोकराव काळे, आ. आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रवीण शिंदे, सरपंच योगिता घारे, रामनाथ घारे,नंदकिशोर औताडे, राजेंद्र पाचोरे, विलास पाचोरे, अशोक डांगे, जनार्दन पाचोरे, रमेश डांगे, चंद्रकांत खंडीझोड, पोलिस पाटील दामोधर खंडीझोड, पोपट घारे, ग्रामपंचायत सदस्य सौ.कविता अंकुश घारे, सागर घारे, वाल्मिक खंडीझोड, पोलीस कर्मचारी प्रसाद गोरे, आकाश चव्हाण, आदी उपस्थित होते.