यश हे सहजासहजी मिळत नसतं त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात- डॉ.योगेश कोठारी
यश हे सहजासहजी मिळत नसतं त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात- डॉ.योगेश कोठारी
यश हे सहजासहजी मिळत नसतं त्यासाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात- डॉ.योगेश कोठारी
कोपरगाव विजय कापसे दि ३० ऑगस्ट २०२४– श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाचे संस्थापक कै.गोकुळचंदजी ठोळे यांचा १४८ वा. जयंती सोहळा नुकताच विदयालयात संपन्न झाला. या कार्यक्रमात कोपरगाव येथील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. योगेश कोठारी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना पुढे म्हणाले मी याच विद्यालयात घडलो याच विद्यालयाने मला संस्कार दिले आज मी जे काही आहे ते या विद्यालयामुळेच आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की कमी गुण मिळाले म्हणून खचून न जाता जिद्दीने चिकाटीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजेत यासाठी प्रामाणिक प्रयत्न मात्र आवश्यक आहे. तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे तुम्ही वेगवेगळी क्षेत्र निवडा व त्यात पारंगत व्हा यश तुम्हाला सहज मिळेल. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सी.ए. सौ श्वेता योगेश कोठारी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
मुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले ते म्हणाले की विद्यालयाची परंपरा व विद्यालयाचे यश हे माजी विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या गगन भरारी वरच अवलंबून असते. यासाठी माजी विद्यार्थी हे विद्यालयाचे दैवत असतात. संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे यांनी मार्गदर्शन केले ते म्हणाले आमची मराठी माध्यमाची मुले सर्वच क्षेत्रात पुढे जात आहेत. विद्यालयाची परंपरा नवीन काहीतरी करण्याची आहे.आम्ही विदयार्थीवर संस्कार करतो आणि नवीन धोरण राबवतो.संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी शिक्षण क्षेत्रात मोठी क्रांती होत आहे या क्रांती बरोबरच मुला-मुलींनी सामाजिक जाणिवेचे भान ठेवून आपली प्रगती साधून घ्यावी असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला गोकुळचंदजी यांच्या कार्याचा परिचय दिगंबर देसाई यांनी करून दिला या कार्यक्रमात समृद्धी त्रिभुवन या विद्यार्थिनींनी गायलेल्या गीताने सर्वांना प्रभावित केले.या कार्यक्रमात एस.एस.सी.मार्चच्या यशस्वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.या प्रसंगी स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे सहसचिव सचिनअजमेरे, समिती सदस्य आनंद ठोळे,डाॕ.अमोल अजमेरे,संदीप अजमेरे,राजेश ठोळे,माजी मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर,दिलीप तुपसैंदर,प्रकाश दगडे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.मीना पाटणी, भागचंद माणिकचंद ठोळे इंग्लिश मीडियम चे प्राचार्य मकरंद निमोणकर,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश गोरे यांनी केले.