आपला जिल्हा
नान्नज दुमाला येथील पडझड झालेल्या गरीब कुटुंबांना आमदार थोरात यांच्या कार्यालयातून किराणा किटचे वाटप
नान्नज दुमाला येथील पडझड झालेल्या गरीब कुटुंबांना आमदार थोरात यांच्या कार्यालयातून किराणा किटचे वाटप
पावसाने घर पडलेल्या गरीब कुटुंबीयांना आमदार थोरात यांच्याकडून मदतीचा हात
तळेगाव दिघे प्रतिनिधी दि ३० ऑगस्ट २०२४– मागील चार दिवसापासून तालुक्यात झालेल्या भीज पावसाने नान्नज दुमाला येथील दळवी व गवळी कुटुंबीयांचे मातीचे घरे पडल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला या गरीब कुटुंबीयांना काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला.
नान्नज दुमाला येथे श्रावण संतु दळवी व भागवत सहादू गवळी यांना किरणा किट देण्यात आली यावेळी सरपंच भाऊसाहेब कडनर ,उपसरपंच नारायण फड, जनसेवक केशव फड, गाव प्रमुख कैलास मोकळ,छबु दळवी, श्रीराम चत्तर आदींसह आदिवासी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने गोरगरीब व सर्वसामान्य मोठी मदत केली आहे याचबरोबर तालुक्यातील एक गाव आणि वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवले आहेत. याचबरोबर अनेक पात्र लाभार्थींना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला आहे.
गोरगरीब कुटुंबीयांना मदतीसाठी यशोधन कार्यालयाच्या वतीने स्वतंत्र कक्षामार्फत सातत्याने इंद्रजीत भाऊ थोरात व डॉ जयश्री थोरात यांच्या माध्यमातून मदत केली जात आहे. भिज पावसाने श्रावण दळवी व भागवत गवळी यांची मातीचे घरे पडले त्यामुळे या गरिबांची संसार उघड्यावर आली. जनसेवा कारण मार्फत ही बातमी कळताच तातडीने या सर्वांना किरणा किटसह इतर मदत करण्यात आली यामुळे या दोन्ही कुटुंबीयांच्या सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.