काळे गट

कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील; रविवारी कोपरगावच्या सर्व महिला भगिनी जाणार जलपूजनाला

कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील; रविवारी कोपरगावच्या सर्व महिला भगिनी जाणार जलपूजनाला

५ नंबर पाणी साठवण तलावाचे मोठ्या जल्लोषात रविवारी जलपूजन

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ सप्टेंबर २०२४कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न भल्या भल्यांना सोडविता आला नाही.निवडणूक आली की, पाणी प्रश्नावर गळे काढायचे आणि वेळ मारून न्यायची हे कोपरगावकरांनी अनुभवले आहे. परंतु आ.आशुतोष काळे याला अपवाद ठरले असून त्यांनी पाणी प्रश्न सोडविण्याचा शब्द दिला आणि तो पूर्ण करून देखील दाखविला आहे.त्यामुळे कोपरगावकरांना पाणी देणारे आमदार आशुतोष काळेच पुन्हा आमदार होतील असा विश्वास कोपरगाव शहरातील असंख्य महिलांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

रविवार (दि.१५) रोजी शहराच्या पाणी प्रश्नाचा अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा अर्थात ५ नंबर साठवण तलावाचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून मार्गी लागत आहे. त्यामुळे कोपरगाव शहरात विशेषतः महिला भगिनींमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून सर्व महिला भगिनींनी या साठवण तलावाच्या कार्यक्रमाला जाण्याचा निर्धार केला आहे.

जाहिरात

 कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न हा मागील काही दशकापासून प्रलंबित होता त्यामुळे महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागत होता. परंतु २०१९ चे विधानसभा निवडणूकीपूर्वी ५ नंबर साठवण तलाव होवून कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न कायमचा मिटावा यासाठी आ.आशुतोष काळे यांनी अनेक आंदोलने व वेळ प्रसंगी आमरण उपोषण करून हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता परंतु सत्ता नसल्यामुळे हा प्रश्न सोडविण्यात त्यांना त्यावेळी यश आले नाही. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान त्यांनी कोपरगावकरांना शब्द दिला होता. मला संधी द्या, मी कोपरगावचा पाणी प्रश्न सोडवून दाखवतो.

जाहिरात मुक्त

त्या शब्दावर कोपरगाव मतदार संघातील जनतेने व कोपरगावकरांनी विश्वास ठेवून आ.आशुतोष काळे यांना सेवा करण्याची संधी दिली त्या संधीचे सोने करतांना निवडून आल्यानंतर दोनच महिन्यात आ.आशुतोष काळे यांनी पाच नंबर साठवण तलावाच्या खोदाई कामास प्रारंभ केला होता.त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करून १३१.२४ कोटींचा निधी आणून त्यांच्या अथक प्रयत्नातून हे काम पूर्णत्वास जात आहे. हा कोपरगाव शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा प्रश्न मार्गी लागत आहे. याचा विशेष फायदा महिला भगिनींना होणार असून मागील अनेक वर्षांपासूनची अडचण आ.आशुतोष काळे यांनी दूर करून दिलेला शब्द पूर्ण केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरातील महिला भगिनींमध्ये अतिशय आनंदाचे वातावरण असून दिलेला शब्द पूर्ण करणारे व कोपरगावकरांना पाणी देणारे आ.आशुतोष काळे हेच  पुन्हा आमदार होतील असा दृढ विश्वास व्यक्त करून आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील सर्वच महिला या जलपूजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे कोपरगावच्या महिलांनी सांगितले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे