काळे गट

गौतम पब्लिक स्कूल क्रिकेट मध्ये अजिंक्य; करणार तालुक्याचे नेतृत्व

गौतम पब्लिक स्कूल क्रिकेट मध्ये अजिंक्य; करणार तालुक्याचे नेतृत्व

गौतम पब्लिक स्कूल क्रिकेट मध्ये अजिंक्य; करणार तालुक्याचे नेतृत्व

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १२ सप्टेंबर २०२४ :- जिल्हा क्रीडा अधिकारी, अहमदनगर व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा (दि.११) ते (दि.१३)  सप्टेंबर  दरम्यान पार पडल्या. सदर स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघाने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल संघाचा अंतिम सामन्यात नऊ धावांनी पराभवाची धूळ चारत  तालुकास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा जिंकली.

जाहिरात

         स्पर्धेतील पहिलाच सामना बीटीएम स्कूल संघाविरुद्ध विरुद्ध टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर मध्ये सामना जिंकत गौतमच्या संघाने विजयी दौड सुरू केली. कॉर्टर फायनल मध्ये गौतमच्या संघाने केबीपी विद्यालय संघाचा १९ धावांनी पराभव केला; तर उपांत्यपूर्व सामन्यात आत्मा मलिक स्कूल संघाचा ०८ विकेट्सने पराभव करून अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल संघाला गौतम च्या संघाने दिलेल्या आव्हाना पर्यंत पोहोचता देखील आले नाही.गौतमच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर संजीवनीचा संघ अवघ्या २०  धावात गारद झाल्याने गौतमच्या संघाने विजेतेपद पटकावले.

जाहिरात

गौतमच्या विजयी संघाचे नेतृत्व कर्णधार अजय मच्छिंद्र बेंडके व उप-कर्णधार मयूर भैय्यासाहेब पाटील यांनी केले. स्पर्धेदरम्यान उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मोहित पाटील, सोहम आगळे, युवराज बेंडके, उत्कृष्ट फलंदाज म्हणून नैतिक पाटील, मयूर पाटील, अजय बेंडके, युवराज बेंडके, अर्जुन भोये, अभिराज देवरे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आदी पटेल, सुशांत पाटील, संस्कार थेटे, यज्ञेश पवार, यश पाटील, विप्लाव पवार, कार्तिक बेंडके, गोपाल मंगरुळे यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. गौतमच्या वस्तीगृहातील हे निवासी विद्यार्थी राज्यातील अहमदनगर, नाशिक,  संभाजीनगर, पुणे, मुंबई अशा विविध जिल्ह्यातील आहे.

गौतमचा सदर विजयी संघ १९ सप्टेंबर  रोजी आत्मा मालिक येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे नेतृत्व करणार असल्याची माहिती शाळेचे प्राचार्य नूर शेख यांनी दिली. विजयी संघास प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा संचालक सुधाकर निलक, हॉकी प्रशिक्षक रमेश पटारे, फुटबॉल प्रशिक्षक राजेंद्र आढाव, क्रिकेट प्रशिक्षक इसाक सय्यद व दानिश शेख यांनी प्रशिक्षण दिले. संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त व कोपरगाव तालुक्याचे आ. आशुतोष काळे, संस्था सचिव चैतालीताई काळे, सर्व संस्था सदस्य व प्राचार्य नूर शेख यांनी विजयी संघाचे कौतुक करून पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे