कोल्हे गट
पालखेड डाव्या कालव्यातुन पुर्व भागातील बंधारे भरण्यास सुरूवात, विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
पालखेड डाव्या कालव्यातुन पुर्व भागातील बंधारे भरण्यास सुरूवात, विवेकभैय्या कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश
विवेकभैय्या कोल्हे यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत कोळगंगा गेट खुले करत कालव्यात पाणी सोडले
कोपरगांव विजय कापसे दि २० सप्टेंबर २०२४– चालु पावसाळी हंगामात पालखेड धरण शंभर टक्के भरलेले असतांनाही त्याच्या नियोजनांत जलसंपदा खात्याकडुन सातत्यांने त्रुटी राहात असल्यांने जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी शुक्रवारी थेट येवला येथील उपविभागीय कार्यालयात नागरिक, लाभार्थी शेतक-यांसह धडक देत कोपरगांव तालुक्याच्या पुर्व भागातील उपेक्षीतांच्या प्रश्नांना वाचा फोडत येथील दुष्काळजन्य गावांच्या परिस्थितीची जाणीव करून देत निवेदन दिले व कोळगंगा गेट खुले करत त्यांच्या हस्ते पालखेड डाव्या कालव्यांत पाणी सोडण्यांत आले.
लोकप्रतिनिधींनी कोपरगांवच्या पुर्व भागातील कोळनदीवरील बंधारे भरण्याचे फक्त नाटक केले, प्रत्यक्षात पाणी मिळालेच नाही म्हणून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी उपविभागीय कार्यालय येवला येथील कार्यालयावर शुक्रवारी नागरिक, शेतकरी, लाभार्थी कार्यकर्त्यांसह धडक दिली, व नाशिक येथील पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता व उपअभियंता प्रविण पवार यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला आणि कोपरगांव तालुक्याच्या पुर्वभागातील नागरिक, शेतकरी लाभार्थ्यांच्या अडी अडचणी सांगून पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली.
पालखेड अंतर्गत विविध वितरिका चा-या देखभाल दुरूस्तीसाठी १ कोटी रूपयांचे अंदाजपत्रक असतांना चारी नंबर पंचेचाळीस वन एल अजुनही बंदच आहे.,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी पालखेड डाव्या कालव्या समांतर चारा करावा म्हणून सातत्याने मागणी केलेली आहे, तसेच कोळ नदीवरील सर्व बंधारे भरून द्यावे म्हणून प्रत्यक्ष व पत्राद्वारे मागणी केलेली आहे.
तालुक्याच्या पुर्व भागात अद्यापही पुरेशा प्रमाणांत पाउस नसल्यांने नागरिकांसह जनावरांना पावसाळयात पिण्यांच्या पाण्यांचे हाल सोसावे लागत आहे. प्रसिद्धीच्या गर्तेत अडकलेले आमदार यांना तीव्रता लक्षात येत नसून केवळ वेळकाढू पण करण्यात त्यांनी जनतेला भुलविण्याचे काम चालविले आहे.
माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांनी यांनी पुर्व भागातील शेतक-यांच्या समस्या जाणुन घेत पालखेड डाव्या कालव्यातुन प्रत्येक पावसाळयात कोळनदीद्वारे पाणी सोडुन त्याखालील बंधारे पाझरतलाव भरून घेतलेले आहेत, पूर्व भागातील शेतकऱ्यांची ते सतत काळजी घेत, परिणामी येथील पिण्यांच्या पाण्यांची तीव्रता कमी झाली अन्यथा शासनांस ऐन पावसाळयात या भागात पाण्यांसाठी टँकर लावावे लागले असते असे सांगुन विवेक भैय्या कोल्हे यांनी पालखेड डाव्या कालव्यातुन कोपरगांव तालुक्याच्या पुर्व भागातील सावळगांव, शिरसगांव, तिळवणी, आपेगांव, गोधेगांव, करंजी, पढेगांव, कासली, ओगदी, दहेगांव बोलका, आंचलगांव, बोलकी, शिंगणापुर, नाटेगांव, उक्कडगांव व तळेगांवमळे या पाझरतलाव व बंधा-यात पुर्ण क्षमतेने पाणी सोडुन ते सर्व भरून द्यावे अशी मागणी केली. त्यावर सहायक उपअभियंता सौ. अनिता दादासाहेब सरवदे, सहायक उपअभियंता श्रीमती योजना राजेश गोरे यांच्या उपस्थितीत विवेक भैय्या कोल्हे यांच्या हस्ते पालखेड डाव्या कालव्याच्या कोळगंगा हेड व ४५ चारी हेड चे गेट खुले करण्यांत आले तसेच चारी नं ५२ ने उक्कडगांव, आपेगांव, तळेगांवमळे साठी पाणी द्यावे अशी मागणी केली ती या अधिका-यांनी मान्य केली.
याप्रसंगी कोपरगांव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर, पारेगांव ग्रामपंचायतीचे सरपंच सचिन आहेर, माजी पंचायत समिती सदस्य बबनराव निकम, अशोक गायकवाड, अशोक भानुदास शिंदे, अशोक निवृत्ती शिंदे, उत्तम चरमळ, गणेश शिंदे, पिराजी शिंदे, गोरख मिसाळ, डॉक्टर वरकड, रामकृष्ण साळवे, केशव गायकवाड, संतोष भागवत, प्रभाकर उकीरडे, रविंद्र देशमुख, सोपानराव गव्हाळे, रावसाहेब जाधव, दादासाहेब सुंबे, रविंद्र आगवण, तुकाराम आगवण, उमेश शिंदे, रमेश शिंदे, सरपंच किसनराव गव्हाळे, किरण भवर, मनोज तुपे, शंकर शिंदे, सुरेश शिंदे, रेवण निकम, रविंद्र शिंदे, विकास कुलकर्णी, रामदास देशमुख, ज्ञानेश्वर निकम, दत्तात्रय पाटोळे यांच्यासह कोपरगांवच्या पुर्वभागातील विविध गांवचे नागरीक, लाभार्थी शेतकरी, विविध संस्थांचे आजी माजी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. शेवटी दादासाहेब निकम यांनी आधार मानले.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांवच्या पुर्व भागातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या जाणुन घेत त्याच्या सोडवणुकीसाठी सतत संघर्ष केला त्यांची आठवण या निमीत्ताने अनेकांना झाली. ते तालुक्याच्या पुर्वभागाचे एकमेव वाली होते. त्यांचा प्रशासनांवर आदरयुक्त धाक होता – केशवराव भवर