आरपीआयला सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास महायुतीबाबत वेगळा विचार करू- दिपकराव गायकवाड
आरपीआयला सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास महायुतीबाबत वेगळा विचार करू- दिपकराव गायकवाड
आरपीआयला सन्मानपूर्वक स्थान न दिल्यास महायुतीबाबत वेगळा विचार करू- दिपकराव गायकवाड
कोपरगाव विजय कापसे दि २ ऑक्टोबर २०२४– आरपीआय हा महायुतीतील घटक पक्ष असून देखील आरपीआयला महायुतीकडून सन्मानपूर्वक स्थान मिळत नसून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील महायुतीकडून सन्मान मिळत नसल्याची खंत आरपीआयच्या पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे भविष्यात आरपीआयला सन्मानपूर्वक स्थान दिले नाही तर महायुतीचे काम करायचे की नाही हे वेळेवर ठरवण्यात येईल असे प्रतिपादन आरपीआयचे राज्यसचिव दिपकराव गायकवाड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
या पत्रकात ते पुढे म्हणाले की पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून महायुतीला वातावरण अनुकूल असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेब यांच्या शिर्डीच्या उमेदवारी संदर्भात वारंवार मागणी होऊन देखील महायुतीने ती जागा आरपीआय साठी सोडली नाही त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांबरोबरच चळवळीतील सर्वच कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. त्यातच होऊ घातलेल्या विधानसभेला आरपीआयला बारा विधानसभेच्या जागा त्याचबरोबर काही महामंडळांची मागणी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी केली असून नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर विधानसभेच्या जागेसाठी आरपीआय पदाधिकारी व कार्यकर्ते आग्रही आहेत.
नुकतीच आर पी आय चे संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राष्ट्रीय नेते बाळासाहेब गायकवाड राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, राज्य नेते राजाभाऊ कापसे विभागीय प्रमुख भीमाभाऊ बागुल,जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सुनील साळवे ,संजय भैलुमे , जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन,युवक जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे अमित काळे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवर महायुतीकडून सन्मान मिळत नसल्याची भावना व्यक्त केली. त्यामुळे येत्या विधानसभेला आरपीआयला बारा जागा व प्रामुख्याने श्रीरामपूर विधानसभेची जागा न सोडल्यास पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय समाज कल्याण न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांच्याशी चर्चा करून महायुतीचे काम करण्याबाबतचा वेगळा निर्णय घेण्यात येईल असा इशारा देखील गायकवाड यांनी यावेळी दिला.