प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव – पुष्पाताई काळे
प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने कोपरगावात “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव – पुष्पाताई काळे
याहीवर्षी वणी गडावरून येणार देवी सप्तशृंगीच्या पादुका कोपरगावात
कोपरगाव विजय कापसे दि २ ऑक्टोबर २०२४– प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे गुरुवार (दि.०३) ते शनिवार (दि.१२) पर्यंत कोपरगाव शहरातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पाताई काळे यांनी दिली आहे.
मागील अनेक वर्षापासून प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्र उत्सव हजारो महिला भगिनींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाला दरवर्षी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून कार्यक्रमाची व्याप्ती वाढत चालल्यामुळे दरवर्षी महिला भगिनींना नवरात्र उत्सवाची ओढ लागलेली असते. त्यामुळे गुरुवार (दि.०३) पासून सुरु होणारा नवरात्र उत्सव देखील दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी महिलांसाठी होम मिनिस्टर, कार्यक्रम, भव्य दांडिया स्पर्धा अनेक नवीन स्पर्धा व उपक्रमांबरोबरच सिंगिंग स्टार ऑफ कोपरगाव, कौन बनेगी कोपरगाव स्मार्ट सखी,महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन अशा विविध स्पर्धांचा समावेश असल्याचे पुष्पाताई काळे यांनी सांगितले आहे.
या नवरात्र उत्सवानिमित्त महिला भगिनींसाठी योग व दांडिया प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून यामध्ये रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, गव्हाच्या पिठापासून तयार केलेल्या देवीच्या विविध दागिन्यांची स्पर्धा तसेच त्याचबरोबर नवरात्रीच्या नऊ दिवस कुंकुमआर्चन, देवीचे पाठ, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहे. महिलांचा सर्वात आवडता ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमा बरोबरच अनेक स्पर्धांमध्ये महिलांना आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या विजेत्यांना पहिले बक्षीस फ्रीज, दुसरे मायक्रो ओव्हन, तिसरे गॅस शेगडी, चौथे पंखा, पाचवे डिनर सेट, दांडिया स्पर्धा लहान गटासाठी पहिले बक्षीस ३१,०००/- दुसरे २५,०००/-,तिसरे २०,०००/-, चौथे १०,०००/-, प्रथम उत्तेजनार्थ ५,०००/- द्वितीय उत्तेजनार्थ ५,०००/- तसेच दांडिया स्पर्धा खुल्या गटासाठी पहिले बक्षीस ४१,०००/- दुसरे ३१,०००/-,तिसरे २१,०००/-, चौथे ११,०००/-प्रथम उत्तेजनार्थ ५,०००/- द्वितीय उत्तेजनार्थ ५,०००/-, सिंगिंग स्टार ऑफ या स्पर्धेसाठी पहिले बक्षीस कराओके बॉक्स, दुसरे मिनी कराओके बॉक्स, तिसरे ऑडीओ मिक्सर, चौथे ट्रॉफी, महाराष्ट्र ब्रायडल मेकअप कॉम्पिटिशन स्पर्धेच्या विजेत्यांसाठी रोख स्वरुपात बक्षिसे ठेवण्यात आली असून पहिले बक्षीस १५,०००/- दुसरे १०,०००/-,तिसरे ७,०००/-,चौथे ५,०००/- व पाचवे ३,०००/- अशा विविध बक्षिसांची लयलूट करण्याची संधी या “जागर स्त्री शक्तीचा” नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विविध कार्यक्रमांचा महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैतालीताई काळे यांनी केले आहे.
याहीवर्षी भाविकांना सप्तश्रुंगी देवीच्या पावन पादुकांच्या दर्शनाचा होणार लाभ
मागील वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त असंख्य भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या नासिक जिल्ह्यातील वणी गडावरील आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पावन पादुका वणी गडावरून कोपरगावमध्ये आणल्या होत्या. त्यामुळे कोपरगाव शहरासह मतदार संघातील विविध गावातील भक्तांना दर्शनाचा लाभ मिळाला. याहीवर्षी वणी गडावरून आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या विधिवत पूजन केलेल्या पावन पादुका गुरुवार (दि.०३) रोजी कोपरगाव शहरात आणल्या जाणार आहे. या पादुकांची छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते कृष्णाई मंगल कार्यालयापर्यंत सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार असून भाविकांना दर्शनासाठी या पादुका कृष्णाई मंगल कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. या भक्तीमय सोहळ्यात भाविकांनी सहभागी होवून आदिशक्ती सप्तश्रुंगी देवीच्या पावन पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.- पुष्पाताई काळे.