संगमनेर तालुका हा आ.थोरात यांचा परिवार – डॉ.जयश्रीताई थोरात
तळेगाव गणामध्ये युवा संवाद यात्रेचे जोरदार स्वागत
तळेगाव दिघे, वरझडी,लोहारे,कासारे,काकडवाडी,
यावेळी बोलताना डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, संगमनेर तालुका हा सुसंस्कृत राजकारण समाजकारण आणि सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहे. आमदार बाळासाहेब थोरात यांनी कधीही भेदभाव केला नाही. सर्वांच्या प्रगतीसाठी सातत्याने काम केले. हा तालुका त्यांचा बालेकिल्ला मानला जात असून या बालेकिल्ला शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, महिला विद्यार्थी असे सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात. आपला परिवार आहे. मात्र काही बाह्य शक्ती आक्रमण करतील खोटा प्रचार करतील. निवडणुकीसाठी त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नसल्याने एक महिन्याकरता खोटे-नाटे बोलणारी मंडळी पुढे येतील. त्यांना आपल्याच तालुक्यातील काही लोक मदत करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे.
पण हा स्वातंत्र्यसैनिकांचा तालुका आहे. संगमनेर तालुका दादागिरी करत नाही आणि कुणाची दादागिरी सहन पण करत नाही. विकासाची संस्कृती आपल्याला जोपासायची आहे. मोठ्या कष्टातून मातीची घरे, सिमेंटचे झाली सिमेंटची घरे बंगले झाली. ही प्रगती आपल्याला अशीच पुढे न्यायची असून या चांगल्या कामात तरुणांसह सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले.
तर महेंद्र गोडगे म्हणाले की, यावेळी ची निवडणूक ही मुख्यमंत्रीपदासाठी आहे. असं नेतृत्व मिळणे हा भाग्याचा क्षण आहे. आमदार थोरात यांनी अनंत अडचणीवर मात करून दुष्काळी भागात पाणी आणले. सत्ता महाविकास आघाडीचीच येणार असून आमदार थोरात यांच्याकडे राज्याचे नेतृत्व येणार आहे पुढील वर्षी उर्वरित सर्व भागांना चाऱ्यासह पाणी देण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे सांगताना ज्यांना काही करायचे नाही ते लोक व्हाट्सअप वर खोटे बोलत असतात अशी टीका त्यांनी केली. यावेळी सरपंच विलास सोनवणे, मिलिंद कानवडे ,सुभाष सांगळे, सचिन दिघे आदींची ही भाषणे झाली.
सर्व गावांमधून युवा संवाद यात्रेचे ढोल ताशांच्या गजरात पारंपारिक वाद्यात मोटरसायकल रॅली काढून स्वागत करण्यात आले. यावेळी नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते
भव्य मिरवणुकी ठरल्या लक्षवेधी
तळेगाव गणातील प्रत्येक गावामध्ये डॉ जयश्रीताई थोरात यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. लोहारे कासार येथे भव्य मोटरसायकल रॅली निघाली. तर पारेगाव बुद्रुक येथे वारकरी दिंडी निघाली चिंचोली गुरव मध्ये भव्यदिव्य मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर देवकवठे मध्ये जगदंबा माता मंदिरासमोर लेझीम पथकात डॉ जयश्रीताई थोरात यांनीही ताल धरला. देव कवठेतील बैलगाडीची मिरवणूक आणि पारंपारिक वाद्य यामुळे वातावरण जल्लोषमय झाले
काम न करणारे व्हाट्सअप वर खोटे बोलतात – महेंद्र गोडगे
ज्या लोकांनी समाजकारणात कधीही भाग घेतला नाही. कधी कुणाच्या उपयोगी पडले नाही अशी मंडळी व्हाट्सअप वर काहीतरी लिहीत आहे. व्हाट्सअप वर घरात बसून लिहिणे फार सोपे आहे मात्र समाजासाठी काम करणे अवघड असते त्यामुळे खोट्या भुलतापा पसरू नका असे आवाहन त्यांनी केले