आपला जिल्हा

संजीवनी पॉलिटेक्निकच्या पहिल्या ऑटोनॉमस वर्षाचा उत्कृष्ट  निकाल

संजीवनी पॉलिटेक्निकच्या पहिल्या ऑटोनॉमस वर्षाचा उत्कृष्ट  निकाल


एआयसीटीई मान्यता प्राप्त ऑटोनॉमस दर्जाचे संजीवनी हे  महाराष्ट्रातील  पहिले पॉलिटेक्निक

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि ११ जुलै २०२६- महाराष्ट्रात  सर्वात प्रथम अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई.), नवी दिल्ली यांचेकडून विनाअनुदानित वर्गवारीत ऑटोनॉमस दर्जा प्राप्त केलेल्या संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षाच्या  पहिल्या ऑटोनॉमस बॅचचा निकाल महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या अधिपत्याखाली जाहीर झाला असून पहिल्याच वर्षाचा  निकाल उत्कृष्ट  लागला आहे. यात  इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगच्या वर्षा  दादासाहेब भुजाडे हीने  शेकडा ९६. ४३ टक्के गुण मिळवून आपल्या प्रतिभा संपन्नतेचे दर्शन घडविले व सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला. उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता, अद्ययावत अभ्यासक्रम आणि परिणामकारक मूल्यमापन पद्धतीच्या जोरावर संस्थेने तांत्रिक शैक्षणिक क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे, अशी माहिती संजीवनी के बी पी पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

जाहिरात

    संपुर्ण प्रथम वर्षाचे  उच्च गुणवत्ताधारक विद्यार्थी  पुढील प्रमाणे. कंसातील आकडे शेकडा गुण दर्शवितात . काॅम्प्युटर टेक्नाॅलाॅजी-किर्ती सोमनाथ शिंदे  (९५. ८६, सर्व शाखांमधुन द्वीतिय), समिक्षा योेगेश  हाडोळे (९५. ३६, सर्व शाखांमधुन तृतिय), सुचिता मधुकर निप्टे (९५. २९), अमृता अरूण थाटे (९५. २१) व साक्षी संतोश शिंदे  (९४. ९३). मेकॅट्राॅनिक्स- शालुकुमारी भुतकुुनकुमार शाह (९५), पार्थ मुकूंद पिसाळ (९४. ९५) व देविका संतोष  घोंगाणे (९४.०७). मेकॅनिकल इंजिनिअरींग-आकांक्षा नवनाथ पळसकर (९२.७१), शालिनी  मधुकर कडू (९२. ६४) व श्रीहरी मंगेश  देव्हारे (९२. ५७).इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग- वर्षा  दादासाहेब भुजाडे (९६. ४३ ), समर्थ बाळासाहेब मुळे (९३. ५७) व ज्ञानेश्वरी  राहुल गणर (९३. ०७). सिव्हिल इंजिनिअरींग-आदिती मच्छिंद्र वल्टे (९२. ३६), हर्षदा काशिनाथ  नवले (८९. ७९) व प्रांजली महेश  चिने (८६).

जाहिरात

     आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी किंवा पदविका मिळविणे पुरेसे नसून कौशल्याधारित, उद्योगाभिमुख आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज आहे. संजीवनी पाॅलीटेक्निकला ऑटोनॉमस दर्जा असल्याने हीच गरज पूर्ण करत असून विध्यार्थ्यांच्या उज्वल करिअरसाठी सक्षम व्यासपीठ निर्माण करत आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निक  शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थी व पालकांनी स्वायत्त संस्थांना प्राधान्य देणे ही काळाची गरज ठरत आहे. अशा संस्थांमध्ये प्रवेश म्हणजे आधुनिक शिक्षण, उत्तम रोजगार संधी, संशोधनाच्या व्यापक संधी, व्यक्तिमत्त्व विकास आणि यशस्वी भवितव्याची खात्री मानली जात आहे. त्यामुळे आगामी काळात स्वायत्त संस्थांकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येणे स्वाभाविक असून, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा नवा अध्याय या संस्थांच्या माध्यमातून लिहिला जात आहे. संजीवनीचे अध्यक्ष  नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे  अभिनंदन केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे