आपला जिल्हा

विठू नामाचा गजर; श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची आषाढी वारी व साक्षरता दिंडी उत्साहात

विठू नामाचा गजर; श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची आषाढी वारी व साक्षरता दिंडी उत्साहात

विठू नामाचा गजर; श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची आषाढी वारी व साक्षरता दिंडी उत्साहात

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २५ जुलै २०२६-आषाढी एकादशीच्या निमित्ताने श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आयोजित करण्यात आलेली ‘आषाढी वारी व साक्षरता दिंडी’ भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. टाळ-मृदुंगाच्या निनादात “ज्ञानबा-तुकाराम”च्या जयघोषाने परिसर विठ्ठलमय झाला होता.
विद्यालयातून निघालेली दिंडी श्रीराम मंदिर मार्गे कोपरगाव पंचायत समितीपर्यंत काढण्यात आली. वारकरी वेशभूषेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच विठ्ठल-रखुमाईचे रूप धारण केलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दिंडीतून भक्तीभावासोबतच साक्षरतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. साक्षरता फलकाचे आकर्षक लेखन  अतुल कोताडे यांनी केले.

जाहिरात

यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन  चंद्रकांत ठोळे, कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  कैलास ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव  सचिन अजमेरे, खजिनदार  आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोल अजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे,  दिलीप तुपसैंदर आदी मान्यवरांनी दिंडीचे स्वागत करून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

मुख्याध्यापक सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक  बलभीम उल्हारे यांच्यासह  संजय बर्डे, शितल अजमेरे,  संजीवनी डरांगे, रूपाली साळुंखे,  स्वाती जाधव, पल्लवी तुपसैंदर, छाया निंबाळकर,  योगेश गवळे,  दिगंबर देसाई,  सचिन डोळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्स्फूर्त सहभागामुळे ही आषाढी वारी व साक्षरता दिंडी कोपरगावकरांसाठी आकर्षणाचा विषय ठरली आणि उपस्थितांनी या उपक्रमाचे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे