आपला जिल्हा

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची शहरातून भव्य आषाढी दिंडी

संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांची शहरातून भव्य आषाढी दिंडी

बालवारकऱ्यांनी कोपरगावकरांना घडवले पंढरपूर वारीचे दर्शन; सामाजिक संदेशांनी वेधले लक्ष

Kopargaon vijay kapse दि २४ जुलै २०२६वारकरी वेशभूषा, डोक्यावर तुळशीवृंदावन, हातात भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर आणि लेझिमच्या तालावर संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी कोपरगाव शहरातून भव्य आषाढी दिंडी काढत विठ्ठलनामाचा जयघोष केला. या दिंडीमुळे शहरवासीयांना पंढरपूरच्या वारीची भक्तिमय अनुभूती मिळाली.

जाहिरात

कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक राजेंद्र झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या दिंडीत विद्यार्थ्यांनी धार्मिक परंपरेसोबतच सामाजिक जनजागृतीचाही प्रभावी संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या हातातील “भेसळमुक्त भारत, निरोगी भारत”, “भेसळयुक्त अन्न टाळा, निरोगी जीवन जगा”, “जिथे विठ्ठलाचे नाम, तिथे स्वच्छतेचे धाम”, “पर्यावरणाचा समतोल राखा”, “पाणी आडवा, पाणी जिरवा” अशा संदेशांचे फलक नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत होते.

जाहिरात

दिंडी सराफ बाजारातील पवार सरकार संस्थानच्या सोमेश्वर महादेव मंदिरात पोहोचल्यानंतर बालवारकऱ्यांनी फुगड्या, भजन-कीर्तन आणि टाळांच्या गजरात हरिनामाचा जयजयकार केला. यावेळी देवस्थानच्या वतीने पालखीचे पूजन करून दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
तसेच, मराठा पंच हनुमान व विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना केळी व साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
यावेळी मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे, कारभारी नजन, व्यापारी राजेंद्र शिंगी, प्रफुल्ल पांडे, सोमेश्वर महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके यांनी बालवारकऱ्यांचे स्वागत केले.

जाहिरात

या भक्तिमय सोहळ्यात संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी विशाल झावरे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पालक मोठ्या संख्येने वारकरी वेशभूषेत सहभागी झाले होते. दिंडीमुळे संपूर्ण कोपरगाव शहर विठ्ठलभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे