कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७ .१९ कोटी; महायुती शासनाचे आमदार आशुतोष काळेंनी मानले आभार
कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७ .१९ कोटी; महायुती शासनाचे आमदार आशुतोष काळेंनी मानले आभार
कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीसाठी ७ .१९ कोटी; महायुती शासनाचे आमदार आशुतोष काळेंनी मानले आभार

Kopargaon vijay kapse दि २४ जुलै २०२६- चालू वर्षी एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव मतदार संघातील गोदावरी नदीवरील कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती आणि नवीन लोखंडी प्लेट बसवण्यासाठी निधी मिळावा यासाठी जलसंपदा विभागाकडे सादर केलेल्या प्रस्तावाची दखल घेवून शासनाने बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन लोखंडी प्लेट्स फळ्या बसवण्यासाठी ७.१९ कोटी निधी मंजूर केला आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी महायुती शासनाचे आभार मानले आहे.

यावर्षी एल निनोचा प्रभाव असल्यामुळे कमी पर्जन्यमान होण्याची शक्यता गृहीत धरून संभाव्य दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे होते. परंतु गोदावरी नदीवरील बांधण्यात आलेल्या हिंगणी, माहेगाव देशमुख, डाऊच,सडे, शिंगवे, पुणतांबा, वडगाव कानळद,मंजूर, व निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे आदी कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्याचे पाणी अडविण्यासाठी वापरात येणाऱ्या लोखंडी प्लेट खराब झाल्यामुळे प्लेट टाकून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत होती.त्यामुळे चालू वर्षी हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजाची गांभीर्याने दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी शासनाकडे कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि नवीन लोखंडी प्लेट्स बसवण्यासाठी निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल केले होते. त्या प्रस्तावाची महायुती शासनाने दखल घेवून हिंगणी बंधारा १ कोटी १० लाख, माहेगाव देशमुख १ कोटी ४० लाख, डाऊच ९० लाख, सडे ३४ लाख, शिंगवे ४५ लाख, पुणतांबा ५० लाख, वडगाव कानळद १ कोटी २० लाख तसेच निफाड तालुक्यातील येथील खेडलेझुंगे बंधाऱ्याच्या दुस्तुस्तीसाठी १ कोटी ४० लाख असा एकूण ७.१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीतून सर्व बंधाऱ्यांवरील संरक्षण रेलिंगची दुरुस्ती, नवीन प्लेट, जोड रस्ता दुरुस्ती आदी तातडीचे आवश्यक कामे पूर्ण करण्यात येणार असून सदरची तातडीची दुरुस्ती कामे १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत तर मोठ्या स्वरूपाची कामे ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.त्यामुळे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले जावून त्या पाण्याचा वापर हजारो हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी होणार आहे. त्याबद्दल आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहे.संभाव्य दुष्काळ परिस्थिती लक्षात घेवून पूर्ण क्षमतेने पाणी अडविण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर टाईप पद्धतीच्या बंधाऱ्यांची विशेष दुरुस्ती आणि नवीन लोखंडी प्लेट बसवण्यासाठी निधी मिळविल्यामुळे बंधाऱ्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व नागरीकांच्या चिंता दूर झाल्या असून त्यांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.



