आपला जिल्हा

ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी ५०% सवलतीचा लाभ घ्यावा-सरपंच प्रदीप चव्हाण

ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी ५०% सवलतीचा लाभ घ्यावा-सरपंच प्रदीप चव्हाण

ग्रामस्थांनी घरपट्टी व पाणीपट्टी ५०% सवलतीचा लाभ घ्यावा-सरपंच प्रदीप चव्हाण

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि २२ नोव्हेंबर २०२५ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतच्या मालमत्ता पाणीपट्टी व दिवाबत्ती कर वसुलीवर थकबाकीवर राज्य शासनाने तब्बल ५० % सवलतीची घोषणा केली आहे या महत्त्वाच्या निर्णयाचे सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी ग्रामस्थांना केले आहे.

जाहिरात
 शासनाच्या या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी याकरिता कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावात सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते.

जाहिरात
 या प्रसंगी गावचे उपसरपंच भाऊसाहेब गागरे, ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे,भगानाना, राजेंद्र जामदार,नामदेव चव्हाण, बाबासाहेब पाडेकर,जयवंत शिंदे, प्रवीण चव्हाण अध्यक्ष शिवबा प्रतिष्ठान आदी गावातील अंगणवाडी, आशा सेविका तसेच महिला बचत गटाचे पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
 या प्रसंगी आयोजित केलेल्या या ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावातील निवासी मालमत्ता धारकांनी १३ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत सन २०२५-२६ ची चालू मागील थकबाकी कर भरणा केल्यात फक्त मागील थकबाकीच्या मागणीवर ५० टक्के कर सवलत देण्याचा ठराव शासनाच्या नियमानुसार एकमताने मंजूर करण्यात आला.
शासनाने अतिशय महत्वाचा निर्णय घेतला असून या संधीचा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींनी तसेच थकबाकीदार असलेल्या मालमत्ता धारकांनी लाभ घ्यावा.
संदीप दळवी
गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे