शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२६ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२६ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील ३२६ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ संपन्न
शिर्डी विजय कापसे दि १० नोव्हेंबर २०२४ : शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी पहिली जिल्हास्तरीय तपासणी झालेल्या २७१ मतदान केंद्रांसाठी द्यावयाच्या ३२६ मतदान यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) प्रक्रिया करण्यात आली. निवडणूक निरीक्षक कविथा रामू, निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थिती ही प्रक्रिया करण्यात आली.
राहाता तहसील येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात झालेल्या या सरमिसळ प्रक्रियेच्यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे, नगरपालिका मुख्याधिकारी वैभव लोंढे, निवडणूक निरीक्षक संपर्क अधिकारी श्रीनिवास वर्पे, नायब तहसीलदार मनोज भोसेकर व बाळासाहेब मुळे आदी उपस्थित होते.
शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या आवश्यकतेनुसार ३२६ बॅलेट युनिट, ३२६ कंट्रोल युनिट आणि ३५३ व्हीव्हीपॅट यंत्रांची दुसरी सरमिसळ (रँडमायझेशन) संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली. तत्पूर्वी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना निवडणूक निर्णय अधिकारी आहेर यांनी सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली.
शिर्डी विधानसभा मतदार संघासाठी मतदान केंद्राच्या १२० टक्के प्रमाणात बॅलेट आणि कंट्रोल युनिट, तर १३० टक्के प्रमाणात व्हीव्हीपॅट यंत्रे प्राप्त झाली आहेत. ही यंत्रे स्ट्रॉंग रूममध्ये पोलीस सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. दुसरी सरळमिसळ प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना स्ट्रॉंग रूममध्ये घेऊन जाऊन दाखविण्यात आली. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजेपासून ही यंत्रे मतदानाच्या दृष्टीने तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात होणार आहे, असे श्री.आहेर यांनी सांगितले.