श्री राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराजांच्या जीवनातील घटनाक्रम
३५ व्या पुण्यतिथी निमित्त बाबाजींना कोटी कोटी प्रणाम
कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२४– श्री राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज यांचा जन्म गुरुवार दि.२४ सप्टेंबर १९१४ शके १८३६ रोजी सकाळी ७:४५ वा दहेगाव मधील अतिशय श्रीमंत पाटील घराण्यात झाला. बाबाजींच्या वडिलांचे नाव “श्री आप्पाजी पाटील” व आईचे नाव “मातोश्री म्हाळसादेवी.”
तपश्चर्या कालावधी सन १९५४ ते १९६५
श्री संत जनार्दन स्वामी ( मौनगिरी ) महाराज आपल्या तपश्चर्यासाठी व अध्ययनासाठी सन १९५४/१९५५ ते १९६४-१९६५ पर्यंत नागेश्वर, ता.अंदरसूल ,जि. नाशिक मंदिरात होते. बाबाजी १८ तास सिद्धासंनात तपश्चर्या करत असत फलस्वरूप भगवान शिव शंकराने बाबाजींना साक्षात दर्शन दिले.
महानिर्वाण तिथी १० डिसेंबर १९८९
मार्गशीर्ष शु ||१२ शके १९११ ,दि. १० डिसेंबर १९८९ च्या पहाटे ४.३५ वाजता ब्रह्ममुहूर्तावर बाबाजी निजधामाला गेले. ज्याला बाबाजी समजले त्यांच्या साठी बाबाजी प्रत्येक ठिकाणी जळी,स्थळी,काष्ठी ,पाषाणी त्यांच्या जवळच आहे. श्री संत जनार्दन स्वामींनी शेवटी समाजाला संदेश दिला ” चला उठा कामाला लागा ! सतत उद्योग करा.”
जन्म – २४ सप्टेंबर १९१४ महानिर्वाण – १० डिसेंबर १९८९ जन्म भूमी – टापरगाव, ता. कन्नड, जि.औरंगाबाद आराध्य दैवत – त्रंबकेश्वर तप भूमी – अंदरसूल कर्म भूमी – वेरूळ महानिर्वाण भूमी – तपोवन, नासिक समाधी भूमी – कोपरगांव बेट आवडता मंत्र – महामृत्युंजय मंत्र आवडते आसन – सिद्धासन आवडती नदी – नर्मदा आवडता छंद – शिव मंदिर बांधणे, शेती करणे आवडता प्राणी – गाय आवडते दान – अन्नदान, श्रमदान आवडता ग्रंथ– श्रीमद भागवत, गीता आवडता आहार – फलाहार आवडते पेय – गायीचे दूध आवडता आश्रम – शिवपुरी व नासिक आश्रम आवडते कर्म – नित्य नियम विधी, यज्ञ, जप अनुष्ठान