शुक्रवारी पंचाळे येथे सुप्रसाध मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान तपासणी — मुख्यकार्यकारी अधिकारी निकम
शुक्रवारी पंचाळे येथे सुप्रसाध मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान तपासणी — मुख्यकार्यकारी अधिकारी निकम
शुक्रवारी पंचाळे येथे सुप्रसाध मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटलच्या वतीने मोफत सर्व रोग निदान तपासणी — मुख्यकार्यकारी अधिकारी निकम
कोपरगाव विजय कापसे दि ११ डिसेंबर २०२४ – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आरोग्य सुविधा दिवसेंदिवस महागडी सेवा होत चालली आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आपल्या आरोग्य समस्यांवर उपचार करून घेणे परवडत नाही. अनेक रुग्ण आजारपण आपल्या अंगावर काढतात. यासाठी सर्वसामान्य रुग्णांची तपासणी करने गरजेचे असल्याने सुरेखाताई प्रकाश कोळपे आयुर्वेद मेडीकल कॉलेज व सुप्रसाध मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल कोळपेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. प्रकाश कोळपे व डॉ. धनंजय कोळपे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सर्व रोग निदान तपासणी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पांचाळे येथील मारुती मंदिर येथे शुक्रवार दि १३ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ मध्ये होणार असुन नागरिकांनी तसेच रुग्णांनी शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र निकम यांनी केले.
तपासणी शिबिराची माहिती पुढीलप्रमाणे
महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य (MJPJY) योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY), आता सर्व प्रकारच्या रेशनकार्ड धारकांना योजनेअंतर्गत होणार मोफत उपचार.
हाडांच्या सर्व आजारांवर उपचार
सर्व प्रकारच्या फॅक्चरवर उपचार व ऑपरेशन्स, मणक्यांचे विविध प्रकारचे आजार, मांडीचे हाड, पायाचे हाड, हातांचे हाड, ट्रामा केअर-अक्सिडेंट झालेल्या रुग्णांवर उपचार, दुर्बिणीद्वारे गुडघ्याची तपासणी व शस्त्रक्रिया, पाठदुखी/मानदुखी/सांधेदुखी/गुडघेदुखी
डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार
मोतीबिंदू काचबिंदू, लासुर, काळ्या बुबळावरती वाढलेली कातडी (टेरिजियम),
जनरल सर्जरी विभाग
विविध प्रकारचे पोटाचे आजार व ऑपरेशन्स,
मुतखड्यांचे आजार, लघवीला जळजळ होणे, शरिरावरील गाठी, चिकटलेले व फाटलेले आतडी, लघवी थेंब थेंब होणे, प्रोस्टेटचे आजार, अपेंडिक्स , लहान मुलांचे विविध ऑपरेशन्स, विविध प्रकारचे कॅन्सरचे आजार.
दातांच्या सर्व आजारांवर उपचार
पुर्ण व आंशिक कवळी बसविणे, वेडेवाकडे दात सरळ करणे, दात / अक्कल दाढ काढणे, दातात सिमेंट / चांदी भरणे
उपलब्ध सुविधा
पॅथॉलॉजी लॅब, X-Ray (एक्स रे), ई.सी.जी., पंचकर्म, नेफ्रॉलॉजी (किडनी विकार) डायलेसीस, ऍम्ब्युलन्स इ.
वरिल आजारांवर योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रकारचे रेशन कार्ड व आधार कार्ड अत्यावश्यक असुन मुळव्याध व भगंदर मोफत तपासणी तसेच
दातांची व डोळ्यांची तपासणी दर गुरूवारी आणि रविवार अत्यंत माफक दरात आहेत. विशेष म्हणजे
पंचकर्म व शल्यकर्म (सर्जरी) अल्प दरात केले जाणार आहे. जुनाट आजाराच्या फाईल शिबीरास येताना घेऊन येणे आवश्यक आहे या शिबिरात निष्पन्न झालेल्या रुग्णांच्या आजारावर सुप्रसाध हॉस्पिटल कोळपेवाडी येथे उपचार मोफत होणार आहे. तपासणी शिबिराचे अधिक माहितीसाठी सोबत दिलेल्या नंबरवर संपर्क करावा. मो. 7350769191, 7350779191, 8600860012, असे आवाहन डॉ. प्रकाश कोळपे, डॉ. धनंजय कोळपे, मेडिकल डायरेक्टर डॉ. यशोधन पितांबरे व मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र निकम यांनी केले.