थोरात कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून एन एस एस शिबिरातून स्वच्छता अभियान
थोरात कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न
सायखिंडी येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबिर संपन्न झाले. यावेळी राहुरी कृषी विद्यापीठाचे येण्याचे समन्वयक डॉ महावीरसिंग चव्हाण, संस्थेचे मॅनेजर विवेक धुमाळ, सोसायटीचे चेअरमन डॉ.सागर गांडुळे ,दीपक करंजकर, नामदेव गायकवाड, संदीप सातपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर एस वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रा. जी.बी. बाचकर ,कार्यक्रम समन्वयक प्रा.शुभम देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. थोरात कृषी महाविद्यालयाच्या एनएसएस कॅम्पमधून विद्यार्थ्यांनी गावात व परिसरात एक व्यक्ती एक झाड हा कार्यक्रम राबवला. यामधून पर्यावरण संवर्धनाचा मंत्र त्यांनी दिला. तर सात दिवस गावामध्ये संपूर्ण स्वच्छता अभियान राबवले. स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना शेतीशी निगडित असलेल्या नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती ही विविध कुटुंबीयांना दिली.
यावेळी डॉ.चव्हाण म्हणाले की, या महाविद्यालयातील शिबिरामधून कवी ,गायक ,वादक अशा विविध कलावंतांनी विद्यार्थ्यांची संवाद साधला. यामुळे विद्यार्थ्यांना नवीन व्यासपीठ खुले झाले असून भारत हा कृषीप्रधान देश आहे. मात्र या या क्षेत्राला व्यावसायिक रूप देणे गरजेचे आहे. व्यावसायिक पद्धतीने शेती केली तर नक्कीच शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो .नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर हा शेतकऱ्यांनी केलाच पाहिजे असा संदेश त्यांनी दिला. तर प्रा.बाबा खरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर सहकाराबरोबर सामान्य माणसाचे जीवन चांगले होण्यासाठी काम केले. आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांनी दिलेले दंडकारण्य अभियान हे सायखिंडी भूमीमधूनच सुरू झाले होते .हे अभियान जगभर पोहोचले पर्यावरणाचा संदेश यातून सर्वांना मिळाला आहे.शेती आणि पर्यावरण यांचा अत्यंत जवळचा संबंध असून या महाविद्यालयातून होणारे काम या अत्यंत कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ आर एस वाघ यांनी केली सूत्रसंचालन पार्थ पानसरे व प्रतीक्षा वाकचौरे या विद्यार्थिनींनी केले तर प्रशासकीय अधिकारी बाचकर यांनी आभार मानले. यावेळी गावातील ग्रामस्थ व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा आ. डॉ. सुधीर तांबे संस्थेच्या विश्वस्त सौ. शरायुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.