सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या कार्तिक पठारेची हॉकी स्पर्धेसाठी विभागीय पातळीवरील निवड
सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या कार्तिक पठारेची हॉकी स्पर्धेसाठी विभागीय पातळीवरील निवड
सौ.सुशीलामाई काळे महाविद्यालयाच्या कार्तिक पठारेची हॉकी स्पर्धेसाठी विभागीय पातळीवरील निवड
कोपरगाव विजय कापसे दि ११ डिसेंबर २०२४– कर्मवीर शंकरराव काळे एजुकेशन सोसायटीच्या सौ. सुशीलामाई काळे कला, वाणिज्य, विज्ञान, महाविद्यालयातील प्रथम वर्ष कला शाखेतील विद्यार्थी कार्तिक रमेश पठारे याची जवाहरलाल नेहरू स्टेडियम,पुणे येथे होणार्या आंतर विभागीय पातळीवरील हॉकी स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.
संगमनेर महाविद्यालय येथे नुकत्याच आंतर महाविद्यालयीन स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत कार्तिक पठारे याने सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने स्पर्धेत सहभागी होवून या हॉकी स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे त्यामुळे त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियम,पुणे येथे होणार्या आंतर विभागीय हॉकी स्पर्धेत कार्तिक पठारे सहभागी होवून महाविद्यालयाचे नेतृत्व करणार असल्याचे प्राचार्या डॉ.विजया गुरसळ यांनी सांगितले.
या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एजुकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ.अशोकराव काळे, विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ.चैताली काळे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.विजया गुरसळ, सर्व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. कार्तिक पठारे यास महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ.राजेंद्र चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.