आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे
आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुल येवला येथे विज्ञान प्रदर्शन उत्साहात साजरे
येवला विजय कापसे दि ११ डिसेंबर २०२४–येवला येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडियम गुरुकुलात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन अध्यक्ष हनुमंत भोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी हेमंत शाह, परीक्षक म्हणून राहुल नरोडे, चरणदासजी महाराज, सेवादास महाराज उपस्थित होते.
या शिबिरात शाळेतील नर्सरी ते ९वी पर्यंतच्या १७० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला होता. त्यापैकी के.जी सेक्शन चे २५ प्रोजेक्ट तर १ली ते ९वीचे ८० प्रोजेक्ट असे एकूण १०५ प्रोजेक्ट सहित विज्ञान प्रदर्शन दिन अनोख्या पद्धतीने झाला. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट बनवले होते. वोल्कॅनो, वॉटर प्रोजेक्ट ,सोलर सिस्टिम, वॉटर सायकल, रेन वॉटर हार्वेस्टिंग ,मायक्रोस्कोप, फेजेस ऑफ मुन, वॉटर पुरिफिकेशन, वेस्ट मॅनेजमेंट, रोड सिग्नल, कुलर, वर्किंग ऑफ हार्ट, लेझर सिक्युरिटी अलार्म, मॅनेजमेंट एक्सपेरिमेंट, तसेच केजी सेक्शन चे पार्टस ऑफ बॉडी, पार्टस ऑफ प्लांट, चांद्रयान ३ अशा वेगवेगळ्या प्रोजेक्टने संपूर्ण गुरुकुल विज्ञानमय झाले होते.
विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग दाखविला. हनुमंत भोंगळे यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी नक्कीच सायंटिस्ट होतील असे म्हणाले. तसेच प्रतिभा आघाव, सुप्रिया दुसाने,प्रवीण कासार,अंजली उपासे,प्राजक्ता खोकले,सीमा जाधव या पालकांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा जोरी यांनी केले. तर आभार प्राचार्य तुषार कापसे यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका मनीषा कुमकर, वैष्णवी गायकवाड गणित शिक्षिका मोनाली सोनवणे तसेच प्राचार्य, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.