श्री छत्रपती संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय गणित -विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
श्री छत्रपती संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय गणित -विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
श्री छत्रपती संभाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय गणित -विज्ञान प्रदर्शनासाठी निवड
कोपरगाव विजय कापसे दि १० डिसेंबर २०२४–कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पाचोरे यांनी दिली आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यालयात या गणित-विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले. यामध्ये दोनशेहून अधिक प्रकृतीचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सानवी समीर बोरावके, आयुष गणेश बत्तासे, स्वरा योगेश कदम, नील प्रकाश कश्यप या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे माजी आमदार अशोकराव काळे, रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे, स्थानिक स्कूल कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-सदस्य, तसेच सर्व पालकांनी कौतुक करत शुभेच्छा दिल्या.
या प्रदर्शनास राधाबाई काळे कन्या विद्या मंदिरचे आर.एस.चौधरी, जी.जे.मिसाळ यांनी परीक्षक म्हणून कामकाज पाहिले. सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, उपमुख्याध्यापक जगदीश बैरागी, विभाग प्रमुख संजय जगताप, अंबादास बडगु, रविंद्र शिंदे, संतोष थोरात, किरण वसावे, अमोल भगुरे, यांचेसह सर्वच शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.