संगमनेर

१ जानेवारी पासून सहकार महर्षी चषक टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

१ जानेवारी पासून सहकार महर्षी चषक टी-२० राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

२५ रौप्य महोत्सवी वर्ष ; संगमनेरात क्रिकेट प्रेमींना मोठी मेजवानी

संगमनेर विजय कापसे दि ११ डिसेंबर २०२४काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील २५ वर्षापासून जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असून यावर्षीही १ जानेवारी २०२५ ते १७ जानेवारी २०२५ या काळात ही भव्य राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

जाहिरात

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, सहकार महर्षी चषक ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठेची आणि नावाजलेली क्रिकेट स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. या स्पर्धेचे हे २५ वे वर्ष असून यावर्षी अत्यंत मोठ्या उत्साहात या स्पर्धा संपन्न होणार आहे. याकरता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन करण्यात आले आहे .आयपीएल व राज्य पातळीवर खेळणाऱ्या विविध खेळाडूंचा सहभाग यावर्षीच्या या स्पर्धेत राहणार आहे.

जाहिरात

यावर्षी प्रथम बक्षीस २,०१००० ( दोन लाख एक हजार ) रुपये, द्वितीय बक्षीस १,३१,००० ( एक लाख ३१ हजार ) तृतीय बक्षीस ७१,००० आणि चतुर्थ बक्षीस ३१,००० असणार आहेत. याचबरोबर इतरही वैयक्तिक बक्षिसांचा समावेश या स्पर्धेत आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे या स्पर्धेचे उद्घाटन बुधवार दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ.दुर्गा ताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेचा प्रत्येक सामना पाहण्यासाठी किमान दहा हजार प्रेक्षकांची उपस्थिती लाभणार असून हे सामने अधिक रंगतदार व दर्जेदार होण्यासाठी ढोल ताशांच्या गजरासह विविध मनोरंजन सुविधा करण्यात आले आहेत.

जाहिरात

दरवर्षी संगमनेर मध्ये राज्यस्तरीय आयोजन असल्याने यापूर्वी बीसीसीआयचे उपाध्यक्ष खासदार राजू शुक्ला, महाराष्ट्र क्रिकेटचे माजी अध्यक्ष अजय शिर्के, बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरी,अमृता खानविलकर,प्रणव धनवडे यांसह अनेक इतर दिग्गज मान्यवर उपस्थित राहिले आहेत. तसेच या स्पर्धेत भारतीय संघातील सलील अंकोला,अजित आगरकर, झहीर खान, कसोटीपटू अजिंक्य राहणे यांनीही त्यांची कामगिरी या स्पर्धेत दाखवली आहे. यावर्षी या स्पर्धेचे २५ वर्ष असून या स्पर्धेमध्ये हिंदी व मराठी चित्रपट सृष्टीत अनेक कलावंत आणि भारतीय क्रिकेट संघातील व आयपीएल मधील अनेक क्रिकेटपटू उपस्थित राहणार आहेत. ज्या संघांना सहभागी व्हायचे आहे त्या संघांनी २१ डिसेंबर पर्यंतच अंबादास आडेप (9881013320) संदीप लोहे (9970371777) आसिफ तांबोळी (9822500828) मनीष माळवे गिरीश गोरे यांच्याकडे आपली नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कारण यामध्ये निवडक ३२  संघांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

तरी एक जानेवारी २०२५ पासून सुरू होणाऱ्या या क्रिकेट स्पर्धेचा जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी आनंद घ्यावा असे आवाहन जयहिंद लोकचळवळ व क्रिकेट असोसिएशन ऑफ संगमनेर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सहकार महर्षी चषकाशी प्रमुख वैशिष्ट्ये

या क्रिकेट स्पर्धेचे हे २५ वर्ष असल्याने क्रीडा संकुलाची अद्यावत व आकर्षक सजावट करण्यात येणार असून पूर्ण मैदानावर लॉन असून  टर्फ विकेट बनवण्यात आली आहे. याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेचे युट्युब वर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच क्रीक हिरोजवर लाईव्ह स्कोर ही पाहता येणार आहे. प्रत्येक संघाला ड्रेस कोड देण्यात आला असून शंभर किलोमीटर बाहेर येणाऱ्या संघाची राहण्याची, जेवणाची व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेसाठी एमसीएचे मान्यता प्राप्त पंच असणार असून ही स्पर्धा नॉक आउट पद्धतीने खेळवली जाणार आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे