संगमनेर

१७ वर्षीय रुग्ण कर्करोगमुक्त, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्येअत्याधुनिक कार-टी सेल थेरपी यशस्वी

१७ वर्षीय रुग्ण कर्करोगमुक्त, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्यूटमध्येअत्याधुनिक कार-टी सेल थेरपी यशस्वी
रुग्ण कर्करोगमुक्त

हा रुग्ण एसएमबीटीत आला तेव्हा बोन मॅरो ट्रान्सप्लांट करावा लागेल असे प्राथमिकचित्र होते. मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान याठिकाणी उपलब्ध असल्यामुळे आम्हीत्यांना कार-टी सेल थेरपी करण्याचा सल्ला दिला. या थेरपीबाबत सर्व प्रकारची माहितीदिल्यानंतर नातेवाईकांनी तात्काळ होकार दिला. यानंतर कार-टी सेल थेरपी यशस्वीकरण्यात आली. रुग्णाने चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे रुग्णाची प्रकृती सुधारलीआहे. त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आले असून तो कर्करोगमुक्त झाला असल्याचे सांगतानाआनंद होत आहे.

-डॉ गिरीश बदरखे, रक्तविकार कर्करोगतज्ञ, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट

नाशिक  प्रतिनिधी दि १८ डिसेंबर २०२४–  परदेशात अत्यंत महागडी समजली जाणारी व कर्करोग उपचारावर महत्वाची असलेली  ‘कार-टी सेल’ (CAR-T) थेरपी भारतीय संशोधनानंतर सवलतीत उपलब्ध झाली आहे. यासवलतीचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होण्यास सुरुवात झाली आहे. ही थेरपी नुकतीच एसएमबीटी हॉस्पिटलच्या कॅन्सर इन्स्टीट्युटमध्ये १७ वर्षीय रुग्णावर यशस्वी पार पडली. या रुग्णाचे सर्वरिपोर्ट नॉर्मल आले असून हा रुग्ण पूर्णपणे कर्करोगमुक्त झाला आहे. ही थेरपी ल्युकेमिया आणि लिम्फोमा यांसारख्या बी-सेल कर्करोगांवर (रोगप्रतिकारक प्रणालीच्यापेशींमध्ये तयार होणारा कर्करोगाचा प्रकार) उपचार करण्यासाठी महत्वाची असल्याचे एसएमबीटीहॉस्पिटलचे रक्तविकार कर्करोगतज्ञ डॉ गिरीश बदरखे यांनी सांगितले.

जाहिरात
कार-टीसेल थेरपी ही मुंबई आयआयटीचे शास्रज्ञ डॉ. राहुल पूरवार आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे कर्करोग विभागातील प्रोफेसर डॉ. हसमुख जैन यांच्या पुढाकाराने रक्ताच्या कर्करोगावर भारतीय संशोधन प्रणाली आहे. अलीकडेच इम्म्युनोअॅक्ट आणि एसएमबीटी हॉस्पिटल करारबद्ध झाले. यानंतर झालेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये दोन रुग्णांवर एसएमबीटीत यशस्वी उपचार करण्यात आले होते. यानंतर एसएमबीटीच्या विशेष केअर प्लस विभागात नागपूरच्या १७ वर्षीय यशवंत (नाव बदललेले)  वर तिसरी कार-टी सेल थेरपी करण्यात आली. यारुग्णाचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल आले असल्यामुळे हा रुग्ण कर्करोगमुक्त झाल्याचे तज्ञांनी सांगितले. सवलतीच्यादरात होत असलेल्या उपचारपद्धतीचा लाभ आता सर्वसामान्य रुग्णांना मिळण्यास सुरुवातझाली आहे. कार-टी सेल थेरपी उत्तर महाराष्ट्रात एकमेव एसएमबीटी हॉस्पिटल येथे सुरु झाल्याने उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील रुग्णांसाठी आशेचा किरण एसएमबीटी हॉस्पिटल बनले आहे.

जाहिरात

उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठया चॅरीटेबल हॉस्पिटल असलेल्या एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक थेरपी करण्यात आल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. कार-टीसेल थेरपीमध्ये शरीरातील पांढऱ्या पेशींना औषधोपचारांच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्तींमध्ये बदलले जाते. त्यामुळे या पेशी शरीरातील कर्करोग पेशींचा नाश करण्यासाठी काम करू लागतात. टी पेशीरुग्णाच्या रक्तातून गोळा केल्या जातात आणि मानवनिर्मित रिसेप्टरसाठी जनुक जोडून प्रयोगशाळेत अनुवांशिकरीत्या सुधारित केले जातात, ज्याला काइमरिक प्रतिजन रिसेप्टर किंवा ‘सीएआर’ म्हणतात.हे विशिष्ट कर्करोग पेशी प्रतिजन ओळखण्यात मदत करते. त्यानंतर, सीएआर-टी पेशी रुग्णाला परत केल्या जातात. अशा माध्यमातून कार-टी सेल थेरपी कार्य करते. जगातील कॅन्सर उपचारावर होत असलेल्या कोट्यावधी रुपयांचा खर्च भारतीय संशोधनामुळे आता लाखांत आला आहे.

जाहिरात

एसएमबीटी हॉस्पिटल आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल यांच्यामध्ये गेल्या तीन वर्षांपूर्वी सामंजस्य करारामुळे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे तांत्रिक मार्गदर्शनाने एसएमबीटी कॅन्सर इन्स्टीट्युट साकारण्यात आले आहे. याठिकाणी सुसज्ज कर्करोग विभाग कार्यरत असून तज्ञ आणि अनुभवी कर्करोग तज्ञांची मोठी टीम पूर्णवेळ उपलब्ध आहे. मुंबईच्या टाटा स्मारक केंद्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाने येथील सेवेवर रुग्णांचा विश्वास दृढ झाला आहे.

कर्करोग मुक्तीसाठी एसएमबीटी उत्तम पर्याय

एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये अद्ययावत उपचारास प्रभावीपणे सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी विशेष केअर प्लस विभाग सुरु करण्यात आला असून याठिकाणी क्लिष्ट आणि अवघड शस्रक्रीयांसाठी उत्तम प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्धकरून देण्यात आल्या आहेत. याठिकाणी बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कार-टी सेल थेरपी,सर्व प्रकारच्या कर्करोगावर व लहान मुलांच्या कर्करोगावर उपचार केले जात आहेत. विशेषम्हणजे, सुसज्ज आयसोलेशन वार्ड याठिकाणी साकारण्यात आल्याने कर्करोग उपचारासाठी एसएमबीटीउत्तम पर्याय रुग्णांना उपलब्ध झाला आहे.

-डॉ मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल

नवी स्वप्न बघण्याची ताकद एसएमबीटीमुळे मिळाली

मी साधा शेतकरी माणूस आहे,माझ्या मुलाला जेव्हा कर्करोग असल्याचे आम्हाला समजले तेव्हा पायाखालची जमीन सरकली. पण, मुलाला कधी जाणवू दिले नाही की, त्याला हा आजार आहे. एक वेळ अशी होती की,मुलाकडे बघितले तरी डोळ्यात पाणी यायचे इतका तो अशक्त झाला होता. एसएमबीटीत दाखल झालो आणि येथील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी उपचार केले आज डिस्चार्ज आहे, मुलाचीतब्बेत सुधारली आहे,  नवी स्वप्न सोबत घेऊन आनंदाने घरी जात आहोत.

-रुग्णाचे वडील

कर्करोगावर हे उपचार उपलब्ध

एसएमबीटीकॅन्सर इन्सिट्यूटमध्ये टाटा स्मारक केंद्र यांच्या तांत्रिक मार्गदर्शनासह कॅन्सररुग्णांवर उपचार केले जातात.बाह्यरुग्ण तपासणी, तज्ञ डॉक्टरांचा सल्लाव  मार्गदर्शन मोफत उपलब्ध आहे.   यात ऑन्कोसर्जरी, तोंडाची सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, पेडीयाट्रिक ऑन्कोलॉजी, तसेचमेडिकल ऑन्कोलॉजी, किमोथेरेपी, इम्युनोथेरेपी, हार्मोनिल थेरपी करण्यात येते.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे