आपला जिल्हाज्योती पतसंस्था

ज्योती पतसंस्थेच्या समाजपयोगी दिनदर्शिकेचे व क्यूआर कोडचे मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण

 ज्योती पतसंस्थेच्या समाजपयोगी दिनदर्शिकेचे व क्यूआर कोडचे मान्यवरांच्या शुभहस्ते अनावरण

सहकार क्षेत्रात ज्योती पतसंस्थेचे कार्य उल्लेखनीय- पोलीस निरीक्षक कोळी 

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ डिसेंबर २०२४संपूर्ण देशभरात महाराष्ट्र राज्याला सहकार क्षेत्राचा मोठा वारसा लाभला असून या सहकार क्षेत्रात कोपरगावच्या ज्योती सहकारी पतसंस्थेचे कार्य अतिशय उल्लेखनीय असल्याचे गौरवोउद्गार कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी नुकतेच पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे व क्यूआर कोडच्या अनावरण प्रसंगी बोलताना व्यक्त केले.

जाहिरात

 ज्योती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.रविकाका बोरावके यांच्या अध्यक्षतेखाली ज्योती पतसंस्थेच्या “२०२५ दिनदर्शिकेचे व आजच्या ऑनलाईन पेमेंटच्या जमान्यातील “क्यूआर कोडचे” अनावरण पोलीस निरीक्षक संदीप कोळी, कोपरगाव सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, राजेंद्र राहणे, एलआयसी विभागाचे दिपक काळे तसेच बँकेच्या सर्व संचालक मंडळाच्या शुभहस्ते नुकतेच संपन्न झाले.

जाहिरात

याप्रसंगी संस्थेचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड.रविकाका बोरावके यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, संस्थेस ३७ वर्षाची विश्वसनीय परंपरा असून महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था म्हणून सर्वपरिचित कोपरगाव, शिर्डी, सुरेगाव, कोल्हार, राहुरी, श्रीरामपूर, येवला,अहिल्यानगर व पुणे या शाखे मधून संस्थेत ३४५ कोटीच्या ठेवी असून संस्थेचा आजपर्यंत ५७४ कोटी रुपयांचा व्यवसाय असून संस्थेस नेहमीच ऑडिटमध्ये ‘अ’ वर्ग प्राप्त झालेला आहे. संस्थेच्या सर्व शाखेमध्ये ऑनलाइन व्यवहार सुरळीतपणे सुरू आहे तसेच आरटीजीएस द्वारे पैसे ट्रान्सफर करणे, मोबाईल बँकिंग, डीडी काढणे,अतिशय सुलभ रीत्या सर्वांसाठी कर्ज वितरण करणे त्यासोबतच अत्यंत सोयीस्कर व पारदर्शकपणे सोने तारण यासह अनेक सुविधा उपलब्ध असुन संस्थेने आज एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांच्या सोयीसाठी क्यूआर कोड सुरू केला आहे तर दरवर्षी प्रमाणे सामाजिक भावनेतून याही वर्षी  समाजपयोगी दिनदर्शिका ग्राहकांच्या सोयीसाठी उपलब्ध केली असल्याचे ॲड. रविकाका बोरवके यांनी सांगितले .

जाहिरात
तर याप्रसंगी उपस्थित असलेले सहाय्यक निबंधक नामदेव ठोंबळ, एलआयसीचे काळे आदि मान्यवरांनी आपल्या भाषणातून ज्योती पतसंस्थेच्या कामकाजाचे कौतुक करत संस्थापक अध्यक्ष ॲड. रविकाका बोरावके यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे व कर्मचारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे तर संस्थेच्या दिनदर्शिका व क्यूआर कोड अनावरण कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्योती पतसंस्थेचे सर्व शाखांचे व्यवस्थापक, सहव्यवस्थापक यासह सर्व कर्मचारी अधिकारी तसेच सर्व संचालक मंडळांनी अथक परिश्रम घेतले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे