आपला जिल्हा
सरपंच चव्हाण यांनी स्वखर्चाने दिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण
सरपंच चव्हाण यांनी स्वखर्चाने दिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण
सरपंच चव्हाण यांनी स्वखर्चाने दिले ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण
कोपरगाव विजय कापसे दि १८ डिसेंबर २०२४– कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची पहिल्यांदाच कामाची दखल घेत धोत्रे गावचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांनी स्वखर्चाने सर्व कर्मचारी यांचे अपघाती विमा पॉलिसी उतरवली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुढील पाच वर्ष दहा लाखाचे विमा कवच मिळणार आहे या प्रेरणादायी निर्णयाचे सर्व स्तरातून पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला कामानिमित्त कुठे ना कुठे प्रवास करावा लागतोच आणि या प्रवासात कधी काय होईल याचा भरवसा नसतो आणि प्रत्येकाला विमा घेणे शक्य नसते म्हणून याच बाबीचा विचार करत कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावचे सरपंच प्रदीप चव्हाण यांनी पोस्ट मार्फत धोत्रे ग्रामपंचायत मध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा कवच दिले आहे.
या विषयी सरपंच चव्हाण यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, पाणीपुरवठा वीज पुरवठा करत असताना किंवा प्रवासादरम्यान खूप मोठा धोका असू शकतो असे अनेक घटना घडल्या आहेत. यात कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. किंवा काही ठिकाणी अपंगत्व आले आहे अतिशय कमी पगार कुठल्याही. विमा कवच नसताना कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असतात. हेच लक्षात घेऊन विमा कवच देण्याचा तात्काळ निर्णय घेतल्याचे लोकनियुक्त सरपंच प्रदीप चव्हाण यांनी यावेळी सांगितले.
या निर्णयाने कर्मचारी देखील आनंदी झाले. त्यांचा विचार करणारा पहिला सरपंच ग्रामपंचायतला भेटला याची जाणीव त्यांना झाली. पोस्ट ऑफिस धोत्रे गावचे ब्रांच पोस्ट मास्तर दत्तात्रय घोडगे यांच्या मदतीने विमा काढून घेतला या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल सरपंच प्रदीप चव्हाण यांचे ग्रामपंचायत अधिकारी अविनाश पगारे तसेच सर्व सदस्य व कर्मचारी नारायण पोटे, भारत चव्हाण, सागर शिंदे, दिलीप गुंजाळ यांनी आभार मानले.