सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दीनिमित्त महाआरोग्य अभियान
एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने २५ पेक्षा अधिक आजारांसाठी एकाच छताखाली तपासणी व सल्ला
या आरोग्यशिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ. तांबे म्हणाले, एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या वतीने राज्यातील 27 जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील गोरगरीब, ऊसतोड कामगार, आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांना मोफत व माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
हे वर्ष सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने एसएमबीटी हॉस्पिटल, आयएमए , निमा, संगमनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन संगमनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, शहरातील व ग्रामीण भागातील अनेक नामांकित डॉक्टर्स व हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमातून १ जानेवारी २०२५ पासून संगमनेर शहर व तालुक्यात या महाआरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जन्मजात हृदयविकार, हृदयविकार, कर्करोग, मूत्रविकार, किडनी व डायलिसीस, जनरल शस्रक्रिया, अस्थिरोग, सांधेदुखी, पोटदुखी, हाडांचे आजार, स्त्रियांचे आजार, पोटविकार शस्रक्रिया, दंत तपासणी, नेत्ररोग तपासणी व उपचार होणार आहे.
याचबरोबर आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जाणार असून ज्यांच्यावर संगमनेरमध्ये उपचार करणे शक्य नाही त्यांना नंदी हिल येथील एसएमबीटी हॉस्पिटल येथे उपचार केले जाणार आहेत. हे महाआरोग्य शिबिर तालुक्यात विविध ठिकाणी होणार असून यामध्ये त्या परिसरातील स्थानिक डॉक्टर, निमा, आयएमए, संगमनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन व आरोग्य सेवेतील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.या शिबिरातून सर्व तरुण, नागरिक, शेतकरी व महिला या सर्वांनी स्वतःची आरोग्य तपासणी व रोगनिदान करून घ्यावे असे आवाहन एसएमबीटी सेवाभावी ट्रस्ट व यशोधन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
एसएमबीटी हॉस्पिटलला पेशंटला येण्या – जाण्याची मोफत सुविधा
संगमनेर तालुक्यात होत असलेल्या महाआरोग्य शिबिरातून ज्या व्यक्तींवर उपचार करणे गरजेचे आहे. अशा सर्व व्यक्तींना एसएमबीटी हॉस्पिटलला जाण्या – येण्याची मोफत सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे या शिबिरातील नागरिकांना मोठा लाभ मिळणार असल्याने सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.