आपला जिल्हा
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
कोपरगाव विजय कापसे दि १९ डिसेंबर २०२४– महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार मनुष्यासह सर्व जीवसृष्टीला अत्यंत घातक असलेला नायलॉन मांजा दोरा अवैद्यपणे कोपरगाव शहरात विक्री करणाऱ्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाई केल्याने नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखालील पोलीस पथकाने कोपरगाव शहरातील जुनी मामलेदार कचेरी जवळ राहणारा मतीन जब्बार मनियार हा निसर्गातील पक्षी, प्राणी, वृक्ष तसेच मानवी जीवितास अत्यंत घातक असलेला प्लास्टिक किंवा कृत्रिम नायलॉन मांजा दोरा विक्री करण्यास महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णय क्रमांक सीआरटी २०१५/प्र.क /३७/ तां. क्र-२ दिनांक १८/०६/२०१६ अन्ववे नाशिक यांच्याकडील जा.क्र ११६ वाचक नायलॉन मांजा/२०/२०२४ नाशिक दिनांक ३/१/२०२४ अन्ववे काढलेल्या निर्देशाची अवज्ञा करून इतरांच्या जीवित सुरक्षता धोक्यात आणणारी कृती करत त्याच्या राहत्या घरामध्ये नायलॉन मांजाची विक्री करताना बुधवार दि १८ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान आढळून आला असता पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुऱ्हाडे यांच्या फिर्यादीनुसार मनियार विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये ५५९/२०२४ भारतीय न्याय संहिता २२३,१२५ सह पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ कलम ५,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून ८ हजार रुपये किमतीचे ८ नायलॉन मांजाचे रीळ जमा करण्यात आले आहे. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल बी.एच तमनर हे करत आहे.
गेल्या दोन दिवसापूर्वी निसर्गप्रेमी आदिनाथ ढाकणे यांनी सर्व पतंग दोरा विक्री करणाऱ्या गुलाबपुष्प देऊन हात जोडून विनंती केली होती की नायलॉन मांजा दोऱ्या ची विक्री करू नका व त्या प्रसंगी त्यांना अनेक दोरा विकणाऱ्या व्यवसायिकांनी वचन देखील दिले होते की आह्मी नायलॉन चा मांजा दोरा विकणार नाही तरी देखील असे प्रकार घडल्याचे दिसून येत आहे.