संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये जिंकले १ लाखाचे बक्षिस – अमित कोल्हे
संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजने स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनमध्ये जिंकले १ लाखाचे बक्षिस – अमित कोल्हे
आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संजीवनीची कामगिरी अव्वल
कोपरगांव विजय कापसे दि २० डिसेंबर २०२४– संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या सहा विद्यार्थ्यांच्या टीमने चैन्नईच्या सेंट जोसेफ इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘नॅशषनल लेव्हल स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन २०२४’ या स्पर्धेत ‘एआय बेस्ड कस्टमाईज्ड टाईम स्लॉट डिलीव्हरी ऑफ आर्टिकल्स/पार्सल्स’ हा प्रकल्प सादर करून देशातील ८८२२१ टीम्समधुन सॉफ्टवेअर वर्गवारीतुन प्रथम क्रमांक मिळवुन रू एक लाखाचे बक्षिस मिळविले. संजीवनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
श्री अमित कोल्हे पुढे म्हणाले की प्रतप्रंधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन हा देशव्यापी उपक्रम राबविला जात असुन विद्यार्थ्यांना वास्तविक जगातील समस्यांवर सर्जनशिल उपाय विकसीत करण्यासाठी आणि त्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक गतिशील व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या स्पर्धा भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय, एआसीटीई, भारत सरकारच्या इनोव्हेशन सेल आणि एसबीआय फाऊंडेशन मार्फत घेण्यात येतात.
चैन्नई येथिल स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे डॉ. विजयन के असारी, चैन्नई येथिल संस्थेचे चेअरमन डॉ. बी. बाबु मनमोहन, एआयसीटीईचे नोडल सेंटर हेड श्री योगेश वाधवन व श्री अजय गंधे आणि सेंटर फॉर एक्सलन्स इन पोस्टल टेक्नॉलॉजीचे डेप्युटी मॅनेजर श्री विवेकानंदन टी यांचे हस्ते अथर्व संजय भवर, मनिश दिपक बडगुजर, प्रविण सोमनाथ अव्हाड, प्रतिक भाऊसाहेब बुलकुंदे, शताक्षी सतिश भुसारी व महेश दौलत दहे या विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक प्रा. उमेश सांगुळे यांनी प्रशस्तीपत्रके व रू एक लाखाचे बक्षिस स्वीकारले.
श्री कोल्हे पुढे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव कोल्हे यांच्या संकल्पनेतुन व संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजला ऑटोनॉमस दर्जा असल्यामुळे प्रात्यक्षिकांसह उदयोन्मुक तंत्रज्ञान सामाविष्ट असलेला उद्योगाभिमुख अभ्यासक्रम शिकविला जातो. यामुळे येथिल विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात आघाडी घेत आहे, आता विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रकल्प भारतीय डाक सेवेत लागु करणार असल्याचे श्री विवेकानंदन यांनी सांगीतले आहे, असे श्री कोल्हे शेवटी म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या या अभुतपुर्व यशाबध्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक प्रा. सांगुळे, डायरेक्टर डॉ. ए.जी.ठाकुर आणि आयटी व कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या विभाग प्रमुख डॉ. माधुरी जावळे यांचे अभिनंदन केले आहे.