आपला जिल्हाविखे-पाटील

रब्‍बी हंगामात एक व उन्‍हाळ्यासाठी दोन आवर्तनाचे नियोजन केले- नामदार विखे पाटील

रब्‍बी हंगामात एक व उन्‍हाळ्यासाठी दोन आवर्तनाचे नियोजन केले- नामदार विखे पाटील

रब्‍बी हंगामात एक व उन्‍हाळ्यासाठी दोन आवर्तनाचे नियोजन केले- नामदार विखे पाटील

राहाता विजय कापूस दि ६ जानेवारी २०२५नदीजोड प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून गोदावरी खो-यात अतिरिक्‍त  पाणी निर्माण करण्‍यास माझे सर्वौच्‍च प्राधान्य असून, गोदावरी कालव्‍यांच्‍या दुरुस्‍तीसाठी यापुर्वीच १९० कोटी रुपये महायुती सरकारने मंजुर केले आहेत. आता चा-यांच्‍या कामांसाठी २६० कोटी रुपयांच्‍या  प्रस्‍तावाला तातडीने मान्‍यता मिळविण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची ग्‍वाही जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. अगामी काळात लाभक्षेत्रासाठी रब्‍बी हंगामात एक व उन्‍हाळ्यासाठी दोन आवर्तनाचे नियोजन केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

जाहिरात

       गोदावरी डाव्‍या आणि उजव्‍या कालव्‍याच्‍या सल्‍लागार समितीची बैठक मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या अध्यक्षतेखाली संपन्‍न  झाली. या बैठकीला खा. भाऊसाहेब वाकचौरे, आ.आशुतोष काळे, आ. हेमंत ओगले, माजी आमदार सौ.स्‍नेहलता कोल्‍हे, उपविभागीय आधिकारी माणिकराव आहेर, नाशिक विभागाचे मुख्‍य अभियंता प्रकाश मिसाळ, अधिक्षक अभियंता राजेश गोवर्धने, कार्यकारी अभियंता सोनल शहाने, कोल्‍हे कारखान्‍याचे चेअरमन विवेक कोल्‍हे, गोदावरी दुध संघाचे चेअरमन राजेश परजणे यांच्‍यासह लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.

जाहिरात

       ना.विखे पाटील म्‍हणाले की, दोन्‍हीही कालव्‍यांवरील शेतक-यांना आजपर्यंत संघर्षाला सामोरे जावे लागले. हा संघर्ष कमी करण्‍यासाठी आता चांगली संधी मिळाली आहे. गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात नवीन पाणी निर्माण करुन, या भागाचा दुष्‍काळ संपविणे याला आपला प्राधान्‍यक्रम असून, कालव्‍यांची वहनक्षमता वाढविणे हेही आपले उदिष्‍ठ  असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. आता सद्य परिस्थितीत कालव्‍यांची वहन क्षमता वाढविण्‍यासाठी हे ब्रिटीशकालीन कालवे दुरुस्‍तीची मोठी गरज असून, यासाठी महायुती सरकारने १९० कोटी रुपये मंजुर केले आहेत. चा-यांच्‍या कामांसाठीही आता निधी मिळावा म्‍हणून प्रस्‍ताव दाखल करण्‍यात आला असून, २६० कोटी रुपयांच्‍या प्रस्‍तावाला लवकरच मान्‍यता मिळेल असेही ना.विखे पाटील म्‍हणाले.

जाहिरात

       गोदावरीच्‍या लाभक्षेत्रात बिगर सिंचनाचे आरक्षण ५२ टक्‍के झाले आहे. त्‍यामुळेच या भागात अतिरिक्‍त पाणी निर्माण करण्‍यासाठी प्रयत्‍न  करावे लागणार आहेत. लाभक्षेत्रासाठी पुढील काळात तीन आवर्तनांचे नियोजन विभागाने केले असून, १७० दिवसांच्‍या कालावधीमध्‍ये ९० दिवस कालव्‍यांमधून पाणी उपलब्‍ध होईल असे सुक्ष्‍म नियोजन करण्‍यात आले असून, पाण्‍याचा अपव्‍यय होणार नाही याची दक्षता विभागाच्‍या आधिका-यांसह शेतक-यांनीही घ्‍यावे असे त्‍यांनी सुचित केले.

       शिर्डी नगरपालिकेच्‍या वाया जाणा-या साडंपाण्‍यावर प्रक्रीया करुन, ते पाणी चारी क्र.११,१२,१३ मध्‍ये सोडण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे येथील शेतक-यांना बारमाही पाणी मिळण्‍याचे नियोजन असून, पिंपळवाडी चारी क्र.१४ साठी स्‍वतंत्र पाईपलाईन करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या  असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या बैठकीत आ.आशुतोष काळे, खा.भाऊसाहेब वाकचौरे, विवेक कोल्‍हे यांनीही सुचना केल्‍या. जलसंपदा विभागाने केलेल्‍या आवर्तनाच्‍या नियोजनाची माहीती अभि‍यंता गोवर्धने यांनी दिली.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे