डॉ.घायतडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन- डॉ भाग्यश्री घायतडकर
डॉ.घायतडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन- डॉ भाग्यश्री घायतडकर
डॉ.घायतडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन- डॉ भाग्यश्री घायतडकर
कोपरगाव विजय कापसे दि ७ जानेवारी २०२५– कोपरगाव येथील नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या स्व.अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्थेचे सर्वेसर्वा तसेच पाटील डेंटल क्लिनिकचे डॉ.कुणाल घायतडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डॉ. भाग्यश्री कुणाल घायतडकर यांनी दिली आहे.
या विषयी डॉ.भाग्यश्री घायतडकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, स्व.अशोकराव घायतडकर सेवाभावी संस्था व सौ सुरेखाताई प्रकाश कोळपे आयुर्वेद मेडिकल कॉलेज व सुप्रसाध मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कोळपेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉ.कुणाल अशोकराव घायतडकर यांच्या वाढदिवसा निमित्त गुरुवार दि ९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत कोपरगाव शहरातील शारदा नगर येथील श्री सप्तशृंगी माता मंदिराजवळ मोफत सर्व रोग निदान तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. भाग्यश्री घायतडकर यांनी केले आहे.
या शिबिरात हाडांच्या सर्व आजारावर उपचार, डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, दातांच्या सर्व आजारांवर उपचार, जनरल सर्जरी विभाग तसेच आयुर्वेदिक विभागाच्या वतीने सहभागी झालेल्या सर्व रुग्णाची आवश्यकते नुसार मोफत तपासणी करत निदान तपासणी करण्यात येणार असून गरज पडल्यास सुप्रसाध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल कोळपेवाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जाणार असून तरी जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ घायतडकर पाटील डेंटल क्लिनिकच्या वतीने करण्यात आले आहे.