तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत दिले मागण्याचे निवेदन
तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने उपमुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत दिले मागण्याचे निवेदन
कोपरगाव विजय कापसे दि ७ जानेवारी २०२४– महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटना शाखा -अहिल्यानगर यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ यांची भेट घेऊन जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी संवर्गाच्या विविध प्रलंबित मागण्याबाबत निवेदन सोमवार दि ६ जानेवारी रोजी देण्यात आले.
संगणक परिचालक मानधन व ऑनलाइन कामकाजामधील अडीअडचणी सोडविणे बाबत, ग्रामपंचायत अधिकारी संवर्गास ५ दिवसाचा आठवडा लागू करण्यात आलेला आहे तरी सुट्टीच्या दिवशी कामकाजाची सक्ती न करणे बाबत,अकोले तालुक्यातील नुकत्याच बदली झालेल्या आदिवासी क्षेत्रातून बिगर आदिवासी क्षेत्रात समायोजना अंतर्गत बदली झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची तालुक्यातील सेवा जेष्ठता यादी शून्य करावी, आदर्श ग्रामपंचायत अधिकारी प्रस्ताव सन २२-२३ व २३-२४ प्रस्ताव जिल्हा परिषद स्तरावर मागविणे बाबत सदर प्रस्ताव मागविणे पूर्वी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने सुधारित गुणांकन प्रश्नावली तयार करणे, दिनांक २४ सप्टेंबर २०२१ च्या शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायत अधिकारी यांच्या तक्रारी तक्रारीबाबत राजकीय उद्देशाने होणाऱ्या तसेच वैयक्तिक द्वेष भावनेतून होणाऱ्या तक्रारीचा पुरावा असल्याशिवाय दखल न घेणेबाबत, १५ वा वित्त आयोग निधी व्याज रकमेतून नवीन लॅपटॉप खरेदी करण्याकरिता परवानगी देणे व ये ग्रामपंचायत तंत्रज्ञान विकसित करणे बाबत, बचत गट, एकल महिला, विधवा, परित्याकता व घटस्फोटीत महिलांना पाणीपुरवठा योजना चालविण्यास देणे ,नरेगा योजनेअंतर्गत बिहार पॅटर्नची कामे देणे व घरपट्टी पाणीपट्टी वसुली इत्यादी कामे सोपीविणे बाबत, पंचसूत्री कार्यक्रम अंमलबजावणी बाबत विषयनिहाय निवेदनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.