रोहमारे महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर कार्यशाळा संपन्न.
रोहमारे महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर कार्यशाळा संपन्न.
रोहमारे महाविद्यालयात पुणे विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयावर कार्यशाळा संपन्न.
कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२५– राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) हे भारताच्या शिक्षण क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्याचा उद्देश शिक्षण प्रणालीत मूलगामी बदल घडवून आणणे आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी विविध स्तरांवर मार्गदर्शन आणि कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज के. बी. रोहमारे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा संदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या स्कूल कनेक्ट 2.0 या कार्यक्रमांतर्गत या कार्यक्रमाचे समन्वयक व के. जे. सोमैया वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. रवींद्र जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० संदर्भात माहिती देताना डॉ. जाधव म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत उच्च शिक्षण क्षेत्रातही अनेक बदल दिसून येत आहेत. उदा. अभ्यासक्रम लवचिक व अद्ययावत करणे, आंतरविद्याशाखीय दृष्टीकोन, ए.बी.सी. क्रेडिट बँक व आयडी, शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण, क्रेडिट फ्रेमवर्क, इंटर्नशिप, ऑनलाइन शिक्षण, सातत्यपूर्ण परीक्षा मूल्यमापन, स्वयंम पोर्टल, दिशा पोर्टल, मल्टिपल एन्ट्री व एक्झीट ची सोय, एस. डी.जी., चॉईस बेस्ड शिक्षण, उद्योजकता प्रशिक्षण केंद्रे, मेजर व मायनर विषय, भारतीय ज्ञान परंपरा, व्यावसायिक आणि कौशल्य संवर्धन अभ्यासक्रम, ओजीटी, कॅम्पस मुलाखत आणि प्रशिक्षण, विद्यालक्ष्मी कर्ज योजना, विविध शिष्यवृत्ती योजना व सावित्रीबाई फुले विद्यापीठ एन.ई.पी. नुसार राबवत असलेले विविध शैक्षणिक उपक्रम इ. विषयावर विस्तृत मार्गदर्शन करून महाविद्यालयात यासंदर्भात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा याची माहिती दिली. शिक्षकांनी नवीन अध्यापन पद्धती आत्मसात करणे, विद्यार्थ्यांनी बदलाला सामोरे जाणे आणि पालकांनी ही पद्धती समजून घेणे गरजेचे आहे व शिक्षण क्षेत्रातील या बदलांमुळे भविष्यात विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होतील आणि भारताची शैक्षणिक गुणवत्ता जागतिक स्तरावर उंचावेल असा आशावाद व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अभिजीत वाघ यांनी केले तसेच आभार प्रदर्शन दत्तात्रय सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सोनवणे बी. आर., ज्येष्ठ प्राध्यापक बी. डी. होन, जाधव सर,जगझाप सर, बुधवंत सर, भोंडवे सर, कांबळे सर व इतर शिक्षक वृंद उपस्थित होते.