एस.एस.जी.एम कनिष्ठ महाविद्यालयास शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन समितीकडून ‘अ’ श्रेणी मानांकन
एस.एस.जी.एम कनिष्ठ महाविद्यालयास शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन समितीकडून ‘अ’ श्रेणी मानांकन
एस.एस.जी.एम कनिष्ठ महाविद्यालयास शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन समितीकडून ‘अ’ श्रेणी मानांकन
कोपरगाव विजय कापसे दि १३ जानेवारी २०२५– रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. कनिष्ठ महाविद्यालयास नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ०१ जानेवारी २०२५ रोजी संस्थेने गठीत केलेल्या शालेय मानके मूल्यांकन समितीने भेट दिली.समितीचे प्रमुख सी.डी.जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूरचे प्राचार्य डॉ.सुहास निंबाळकर होते तसेच मुख्याध्यापक श्री काशिनाथ लव्हाटे आणि इतर पाच सदस्यांची समिती गठित केलेली होती.या सर्वांनी मिळून कनिष्ठ महाविद्यालयाची एकूण २० मुद्द्यांच्या आधारे सूक्ष्म तपासणी केली. समितीसमोर विज्ञान विभाग प्रमुख पाटील के.एस.यांनी ज्युनिअर विभागातील सर्व उपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले.
समितीने कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केलेल्या प्रयत्नांपासून तर एकूणच शैक्षणिक वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला. यामध्ये शिष्यवृत्ती, निकाल, शिक्षक प्रशिक्षण, शास्त्रीय प्रयोग, पर्यावरण शिक्षण, स्वाध्याय, शारीरिक शिक्षण, स्वच्छतागृह व्यवस्था, सहशालेय उपक्रम, शैक्षणिक साहित्य, ग्रंथालय, अभिलेख जतन, सीईटी/ नीट/जेईई प्रवेश परीक्षा इ. विषयांसंबंधी पुराव्यासहित निरीक्षण नोंदविण्यात आले.कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, क्रीडांगण आणि एकूणच परिसराला भेटी देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी देखील हितगुज करण्यात आले.
महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांनी अभिनंदन पर मनोगतात , “ या यशाचे सर्व श्रेय उपप्राचार्य श्री. शिंदे एस.एस, कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यवेक्षक, प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधू-भगिनी यांचेच आहे.” असे प्रतिपादन केले.
कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हॉ. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲड. संदीप वर्पे, चैतालीताई काळे, विवेक कोल्हे, सुनील गंगुले, महेंद्रशेठ काले, बाळासाहेब आव्हाड यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, कार्यालय अधीक्षक, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, पालक, विद्यार्थी आदींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.