के जे सोमय्या कॉलेज

के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य शाखा आयोजित उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न

के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य शाखा आयोजित उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न

के. जे. सोमैया महाविद्यालयात वाणिज्य शाखा आयोजित उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा संपन्न

जाहिरात आत्मा

कोपरगाव विजय कापसे दि १४ जानेवारी २०२५–  वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी सॉफ्ट स्किल्स व हार्ड स्किल्स आत्मसात केल्यास भावी   काळात ते यशस्वी उद्योजक होऊ शकतात असे उदगार निलया फाउंडेशन चे डॉ.अविनाश शिरसाट यांनी काढले. के.जे. सोमैया महाविद्यालयातील वाणिज्य शाखेने आयोजित केलेल्या उद्योजकता विकास या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. आधुनिक काळात बदलत चालेले उद्योजक, नाविन्याचा ध्यास असणारे तरुण उद्योजक व उद्याजक्तेसाठी आवश्यक गुण वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांकडे अभ्यासक्रम द्वारे प्राप्त होतच असतात फक्त विद्यार्थ्यांनी स्वतःला अपडेट ठेवणे व काळानुसार व्यवसायात बदल केला पाहिजे असे ते म्हणाले. वाणिज्य शाखेने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे कौतुक प्र.प्राचार्य.डॉ.विजय ठाणगे यांनी केले.

जाहिरात

वाणिज्य विभागप्रमुख डॉ.एस.आर.पगारे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळेचे उद्देश स्पष्ट करून महाविद्यालयातील विविध विभागांची ओळख पाहुण्यांना करून दिली. वाणिज्य मंडळाच्या कार्याचा देखील त्यांनी आढावा घेतला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.एस.एल. अरगडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. अजित धनवटे यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. विजय सोमासे यांनी मांडले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी डॉ.रवींद्र जाधव, प्रा.सुनील गुंजाळ, प्रा.स्वागत रणधीर व प्रा.कु.गाडे यांनी काम पाहिले. या प्रसंगी पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे