आपला जिल्हा

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर

आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांना यश ; संगमनेरच्या रस्ते विकासासाठी १० कोटींचा निधी मंजूर

बसस्थानक ते प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा होणार विकास ; रुंदीकरणासह ड्रेनेज व्यवस्थेचाही समावेश

Sangmner vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६ संगमनेर शहराच्या पायाभूत सुविधा विकासाला चालना देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून राज्य महामार्ग क्र. ७१ वरील महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासासाठी १० कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. अमृतकाल रस्ते विकास आराखड्यांतर्गत एकत्रित तरतुदीतून हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

जाहिरात

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून इंजिनिअरिंग कॉलेज ते संगमनेर हायटेक बस स्थानक या रस्त्याचे काम अत्यंत दर्जेदार झाली असून हा रस्ता मॉडेल ठरला आहे. पुन्हा संगमनेर ते रायते फाटा या रस्त्याच्या कामालाही मंजुरी मिळाली असून काम प्रगतीपथावर आहे. संगमनेर बसस्थानक, पीडब्ल्यूडी कॉर्नर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि पुढे दिल्ली नाकामार्गे प्रवरापुलापर्यंतच्या रस्त्याचा या प्रकल्पांतर्गत विकास करण्यात येणार आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या मार्गाच्या सुधारणेसाठी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या प्रयत्नांना या निधी मंजुरीमुळे महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

जाहिरात

या कामामध्ये संपूर्ण रस्त्याचे रुंदीकरण, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज व्यवस्था तसेच विविध युटिलिटी लाईन्ससाठी आवश्यक कामांचा समावेश आहे. त्यामुळे रस्त्याची क्षमता वाढण्यास, वाहतुकीचे नियोजन सुधारण्यास आणि शहरातील नागरी सुविधांना बळकटी मिळण्यास मदत होणार आहे.

जाहिरात

संगमनेर शहरातील रस्ते आणि पायाभूत सुविधांचा विकास अधिक सक्षम करण्याच्या दिशेने आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांतून मिळालेला हा निधी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याने संगमनेर शहरातील नागरिक व युवकांनी समाधान व्यक्त केले आहे.

 

आ तांबे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे