आपला जिल्हा

कळमजाई परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरेल– माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कळमजाई परिसर पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरेल– माजी मंत्री बाळासाहेब थोरात

कळमजाई मंदिर  सुशोभीकरणासाठी आ. सत्यजित तांबे प्रयत्नातून 25 लाख रुपयांचा निधी

गर्द हिरवाई ,रिमझिम पाऊस आणि महिलांच्या लेझीम पथकात स्वागत

Sangmner vijay kapse दि १७ ऑगस्ट २०२६संगमनेर तालुक्याला निसर्गाचे मोठे वरदान लाभले असून गर्द हिरवाईने नटलेले डोंगर, पावसाची रिमझिम आणि अशा रमणीय वातावरणात अत्यंत मोठ्या उत्साहाने आणि आनंदान महिला भगिनींनी लेझीम पथकात लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांचे केलेले स्वागत हे संस्मरणीय ठरले असून हा परिसर पर्यटकांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

जाहिरात

कोठे बुद्रुक व खांडगेदरा परिसरात असलेल्या कळमजाई मंदिरासाठी आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून सुसोबी करण्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत होणाऱ्या विविध कामांच्या शुभारंभ करण्यात आला यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष अक्षय ढोकरे, शांताराम ढोकरे, दत्तात्रेय खांडगे, राजू ढोकरे, बबलू खांडगे, पोलीस पाटील दत्तू खांडगे, सुभाष ढोकरे, माधव ढोकरे ,प्रकाश खांडगे, संजय खांडगे, ओंकार ढोकरे, जालिंदर ढोकरे, सुधीर खांडगे, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नातून कळमजाई मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या अंतर्गत सभामंडप, विद्युतीकरण, रस्ता, पेविंग ब्लॉक यांच्यासह विविध सुशोभीकरणाची कामे होणार आहेत.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे तालुक्यात 171 गावे आणि 258 वाड्यावर असते असून आपण सातत्याने प्रत्येक गावामध्ये विकासाच्या योजना राबवल्या आहेत. शांतता सुव्यवस्था आणि भक्कम अर्थव्यवस्थेबरोबर बंधू भावाचे वातावरण असलेला हा तालुका राज्यांमध्ये अग्रगण्य आहे. कळमजाई परिसर हा निसर्गाच्या सानिध्यात असून येथील धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी असते. नव्याने होत असलेल्या सुशोभीकरणामुळे हे पर्यटकांसाठी आकर्षण ठरेल असे ते म्हणाले.

जाहिरात

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, संगमनेर तालुका हा निसर्गाने समृद्ध तालुका आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात बाळेश्वर, निझरनेश्वर, रामेश्वर, अकलापूरचे दत्त देवस्थान, खंडेश्वर या विविध तीर्थक्षेत्रांचा मोठा विकास झाला आहे. कळमजाई हा परिसर भाविकांसाठी आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे निसर्गाचे भरपूर वरदान या ठिकाणी असून येणाऱ्या पाच वर्षांमध्ये अमुलाग्र बदल या परिसरात झालेल्या दिसेल असे ते म्हणाले.

तर अजय फटांगरे म्हणाले की लोकनेते बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पठार भागातील प्रत्येक गावात विकासाच्या योजना आपण राबवले आहेत. कळमजाई परिसरामुळे पर्यटक वाढवून ग्रामीण अर्थव्यवस्था समृद्ध होण्यास मदत होणार आहे. या निधीमधून विविध विकासकामे मार्गी लागल्याने हे मंदिर अधिक आकर्षक होईल असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक युवक काँग्रेसचे अक्षय ढोकरे यांनी केले तर दत्तात्रय खांडगे यांनी आभार मानले यावेळी गावातील ग्रामस्थ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

निसर्गरम्य डोंगरांमधून लेझीम पथकात मिरवणूक ठरली लक्षवेधी

लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांच्या स्वागतासाठी गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे लेझीम पथक बसवले. ग्रामीण भागातील महिलांनी लेझीम पथकावर धरलेला ठेका, आनंद उत्सव, पावसाची रिमझिम, हिरवा परिसर, यामुळे हा सोहळा अत्यंत संस्मरणीय ठरला. याचबरोबर  सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांचे खांडगेदरा व हा परिसर अत्यंत आवडता राहिला असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे