नेता नव्हे मित्र मा.आ.डॉ.सुधीर तांबे- नामदेव कहांडळ
नेता नव्हे मित्र मा.आ.डॉ.सुधीर तांबे- नामदेव कहांडळ
समाजकारण हा वसा जपतांना अभ्यासू व प्रामाणिकपणा आणि थेटसंपर्क,नाविण्याचा ध्यास या पैलूंमुळे जनतेच्या आग्रहास्तव साहेब राजकारणात आले.मतिमंद व मुक बधिरांसाठी आधारवड ठरलेल्या आ.डॉ.तांबे यांनी संग्राम मुकबधीर विद्यालयाच्या माध्यमातून सेवाभावी काम सुरु ठेवले आहे.प्रथमच संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष होवून त्यांनी शहराच्या विकासासाठी दुरदृष्टीतून अनेक ऐतीहासीक निर्णय घेतले.पुढे विविध पदांवर काम करतांना जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील विविध क्षेत्रातील अनेकांनी साहेबांशी संपर्क केला.पुन्हा एकदा पदवीधरांच्या मागणीवरून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक लढविली 2009 मध्ये पदवीधर मतदार संघातून महाराष्ट्रात विक्रमी मतांनी विजयी होण्याचा इतिहास आ.डॉ.तांबे साहेबांनी घडविला
.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीचा व विचारांचा वारसा त्यांना लाभला. त्याच विचारांवर काम करुन आ.बाळासाहेब थोरात रायात महसूलसारख्या महत्वाच्या खात्याची जाबाबदारी सांभाळली आहे.आज उभा महाराष्ट्र आ.बाळासाहेब थोरात यांच्याकडे संस्कृत नेता म्हणून मोठ्या आशेने पाहतो आहे.याच पद्धतीत आ.डॉ तांबे साहेब हे काम करत आहेत .गोर – गरिब असा कोणताही भेद न करता त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सततचा ध्यास घेतलेले पुरोगामी विचारांचे पाईक असलेले आ.डॉ सुधीर तांबे हे अविश्रांत काम करणारे आमदार म्हणून लोकप्रिय झाले आहेत.पाच जिल्ह्याच्या कामांचा प्रचंड व्याप असून ही आ.डॉ.साहेबांनी विविध विषयांचे वाचन व प्रत्येक विषयाचा बारीक अभ्यास केला आहे. यामुळे विधापरिषदेत आपल्या अभ्यासपूर्वक मांडणी वरून त्यांनी प्रत्येक निवेदनावर सभागृहाचे लक्ष वेधले आहे.
सुसंस्कृत राजकारणाचा वसा त्यांनी सतत जपला आहे. म्हणून तर खान्देशातील चोपडा,रावेर,ते नगरमधील जामखेडपर्यंत ते लोकप्रिय ठरले आहेत. सतत हसत मुख स्वभाव , सहज होणारा संपर्क आणि कामाच्या पाठपुराव्याची पध्द्त यामुळे पाच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात साहेब लोकप्रिय झाले असून या तालुकयांमधील कार्यकर्त्यांचा सतत ओघ आहे.
विधान परिषदेत काम करतांना शिक्षक सेवकांच्या मानधनाची वाढ ,सर्वांसाठी आरोग्य विमा योजना, बेरोगार महामंडळ,1 जाने 2005 पासून सर्व कर्मचार्यांना निवृत्ती वेतन योजना लागू अशा विविध महत्वांच्या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा करुन ती मार्गी लावली आहे. विनाअनुदानीत शाळांचे प्रश्न तसेच तेथे काम करणारे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे प्रश्न सातत्याने आग्रहपुर्वक मांडणी करुन मार्गी लावले आहे.डॉक्टर,वकील,शासकीय ,निमशासकीय कर्मचारी ,शेतकरी,विद्यार्थी,महिला,तरुण,
संपुर्ण खांन्देशात डॉ.तांबे साहेब यांच्या रुपाने जनतेला हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. मा.आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी राज्यात महत्चाची जबाबदारी सांभाळली असल्यामुळे खांदेशातील अनेक प्रश्न आ.डॉ.तांबे साहेबांच्या माध्यमातून मार्गी लागलेली आहे. अफाट स्मरण शक्ती ही सर्वांना आचंबीत करणारी आहे.एकदा भेट झाली की नाव घेवुन हाक मारण्याची पध्दत यामुळे उत्तर महाराष्ट्रात अनेक युवक पहिल्या भेटीला तांबे साहेबांचे चाहते झाले आहेत.मा.नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबे यांची आ.डॉ.तांबे साहेबांना अनमोल साथ मिळाली साहेबांच्या यशात महत्वपुर्ण वाटा उचलतांना महिला सबलीकरणासाठी जयहिंद महिला मंचच्या माध्यमातून ताईंनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक असणार्या आ.डॉ.तांबे साहेबांनी हे अभियान सह्याद्री पासून सातपूडा पर्वतांपर्यत पोहचविले आहे .एक प्रेमळ मनाचा माणून म्हणून सर्व युवापीढी आ.डॉ.तांबे साहेब यांच्या कडे बघत आहे.प्रत्येक गोष्टीतील अभ्यास,नवनविन तंत्र-ाानाची माहिती,मराठी,हिंदी,इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे युवकांचे आयकॉन म्हणून आ.डॉ.तांबे साहेब हे सर्वांपुढे आदर्शवत आहेत.