लोकसर्जन मा.आ.डॉ सुधीर तांबे- संदीप वाकचैारे
लोकसर्जन मा.आ.डॉ सुधीर तांबे- संदीप वाकचैारे
लोकसर्जन मा.आ.डॉ सुधीर तांबे- संदीप वाकचैारे
संगमनेर विजय कापसे दि १६ जानेवारी २०२५– आरोग्याच्या क्षेत्रात निदान करण्यात निपून असणार्या डॉक्टरांनी समाज व्यवस्थेतील विविध रोगांवर नेमके पणाने निदान करत त्यावर उपचार करण्यासाठी सुरु केलेला प्रयत्न आजही अनेकांना दिशा देतात त्यांचे हे प्रयत्न विचाराने प्रेरीत करणारे आहेत.अनेकांना डोके भडकाविता येत असतील,मात्र डॉक्टरांनी आयुष्यभर गांभी विचारांवर प्रेम करत अहिंसेच्या मार्गाने विजय मिळवता येतो हा विचार रुजविण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकारण आणि सजन माणूस यांचा संगम हा फारसा अभावाने दिसतो.गेले काही दिवस देशाचे राजकारण या पद्धतीने समोर येत आहे ते पाहिल्यावर राजकारणात चांगल्या माणसाने यावे असे वाटण्यासारखी परिस्थिती नाही.त्यामुळे देशाच्या राजकारणात जीवन व्यतीत करणार्या आणि समग्रपणे सामाजीक,राजकीय चळवळीत झोकून देणार्या सर्वच राजकीय देशाच्या जेष्ठ नेत्यांना राजकारणात चांगली माणसे हवी आहेत. त्यामुळे राजकीय व्यासपीठावर ही माणसे तरुणांना राजकारणात येण्याचे आवाहन करतात.पण तरुणाईला अवती भोवती राजकारणी जसे दिसतात माध्यमे जसे रंगवितात कथा.कांदबरी, सिनेमा,तमाशा यांत राजकारणी जसे दिसतात यावर विश्वास ठेवत तरुणाई आपले मत बनविते आणि राजकारण नको रे बाबा असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष करते.पण ही मनोभूमिकाच भारतीय विकासाला मारक ठरते. आजही राजकारणात चांगली माणसे आहेत. यावर विश्वास ठेवण्यासाठी अवती भोवती राजकारण्यांचा शोध घेतला तर अशाच एका सर्जनशिल आणि लोकसमस्येवर मात करण्यासाठीचा विचार देणारे आ.डॉ.सुधीर तांबे हे एक लोकसर्जन आहेत असे म्हणावे लागेल.
घरातील राजकीय परंपरा पूरोगामी विचारांची आहेत या विचार परंपरेत स्व;ताला झोकून देत काम करत असतांना अवतीभोवतीच्या तरुणाईची अवस्था त्यांनी स्व;ता पाहिली आहे.हाताला काम नाही,डोक्याला विचार नाही,ह्दयाला भाव नाही,अशा परिस्थितीत ही तरुणाई जिवन कंठत असेल तर हे बेकारीचे हात केव्हाही समाजावर उगारले जातील आज अवती भोवतीच्या विचार धारा या तरुणाईला बेफान करण्यासाठी प्रयत्न करत असतांना त्या तरुणाईला चांगली विचार धारा देण्याची गरज आहे.लाचारांची फौज निर्माण करण्यापेक्षा विचारांवर प्रेम करणारे आणि शाहू – फुले ,आंबेडकरांचे साजेशे विचार जोपासणारी तरुणाई निर्माण करण्यासाठी या माणसाने सातत्याने प्रयत्न केला आहे.राष्ट्रप्रेम,राष्ट्रभक्ती यांची नितांत गरज आहे.असे सर्वदूर बोलले जाते मात्र असे काही बोलणारी माणसे विचार करण्यासाठी पुढे सरसावत नाही त्यामुळे मनातील स्वप्न पुर्तीचा आनंद स्वताला मिळत नाही.त्याप्रमाणे समाजालाही अशा वांझोट्या विचारांच्या माणसांचा लाभ होत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी पुरोगामी विचारांची माणसे निर्माण करण्यासाठी जयहिंद युवा मंचची स्थापणा करुन तरुणाच्या मनगटात शक्ती बहाल करण्याबरोबर डोक्याला विचार देण्याचे काम केले आहे.त्यामुळे तरुणाईला प्रतिमा पूजनापेक्षाही विचार पूजक बनविण्याचे काम केल्याने इथल्या तरुणाईला निश्चित एक स्वप्नांचा आधार मिळाला आहे.विचाराने माणूस उत्तम जगू शकतो पण जगण्यासाठी विचारांबरोबर हाताला कामाची गरज आहे. हे ओळखून त्यांनी तरुणाईला स्वयंरोजगाराचा मार्ग दाखविला आहे.इथल्या तरुणाईला सोबत घेतांना महिलांच्या सक्षमिकरणासाठी सातत्याने विचार मांडत संघटन केले आहे. बचत गटाच्या माध्यामातून त्यांनी महिलांना जगण्यासाठी समर्थ बनविण्याचा केलेला हा प्रयत्न कौतूकास्पद आहे.
राजकारणात काम करतांना प्रामाणिकपणे काम करावे.जे होईल ते लगेच सांगावे जेे होणारच नाही त्याला नकार द्यावा.लोक लाचार नाही तर सक्षम होण्याचा विचार देतांना त्यांनी व्यासपीठावरची भाषा आणि कामाची भाषा ही एक ठेवली.व्यासपीठावर शिक्षणाचा कार्यक्रम असो किंवा लोकजागृतीचा, लोकप्रबोधनाचा, कलावंताच्या जिवन प्रवासाचा,अंधश्रद्धा निर्मूलनाचा,किर्तनाचा अथवा कष्ट करणार्या शेतकऱ्यांचा सन्मान या प्रत्येक कार्यक्रमात त्यांनी विचार पेरण्याचे काम केले आहे. २ सालचे महासत्तेचे स्वप्न पाहणार्या भारतीय तरुणाला त्यांनी स्वप्नाबरोबर वास्तवाचेही -ाान दिले.त्यांनी स्वातंत्र्य,समता ,बंधूता या मुल्यांची शिकवण दिली.घटनेच्या प्रती एकनिष्ठ राहण्याचा विचार दिला. प्रत्येक कार्यक्रमातून पुरोगामी विचार तळागाळात रुजविण्यासाठी हा माणूस सतत झटतो आहे.शाहू ,फुलेंचे विचार रुजविल्याशिवाय इथल्या पिढीला व व्यवस्थेला भविष्य नाही हे लक्षात घेवून पुरोगामी विचार सातत्याने पेटते ठेवण्याच्या प्रयत्नांची त्यांनी पराकाष्टा केली जाते. हा विचार घेवून काम करणारी माणसे आज कमी होतांना दिसतात त्यामुळे आदर्श म्हणून कोणाकडे पहावे असा प्रश्न असतांना आपल्या अवतीभोवती असणारी ही डॉक्टरांसारखी माणसे आज आदर्श म्हणून उभे राहतात.पुस्तकांत वाचलेली माणसे ही आकाशाएवढी मोठी वाटतात पण आपल्या अवती भोवती असणारी ही सर्जनशील माणसे उद्याच्या इतिहासाच्या पानावर आपल्या कतृत्वाची नवी गाथा निर्माण करतील.
राजकारणात राहूनही स्वताला इतरांपेक्षा वेगळे ठेवण्याचा केलेला प्रयत्न पाहिला पाहिजे म्हणजे राजकारणात अजूनही किती चांगली माणसे आहे लक्षात येते.राजकारणातील माणसांची दैनंदिन जिवणाची दखल घेतली गेल्यास ही माणसे समाजासाठी किती करतायेत हे लक्षात येते.डॉ.तांबे हे विधानपरिषदेचे सदस्य झाले त्यानंतर त्यांनी पाचही जिल्ह्यात त्यांचे चाहते निर्माण केले त्यासाठी रात्रीचा दिवस करून लोकांच्या अडचणी सोडविण्याचा ध्यास,प्रत्येक माणसाकडे काहीना काही समस्या आहेत त्या समस्यांना उत्तरे आहेत पण त्यासाठी सरकारने काहीतरी करायला हवे.सरकारपर्यंत पोहचण्याची क्षमता ही कष्टकरी समुहाकडे नसते. त्यांच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा सामान्य माणसाच्या वेदनेचा आवाज होवून त्यांनी सभागृहात विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणून लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला .मग ते सरकारी कर्मचारी असो अथवा शिक्षक,डॉक्टर,वकील यांच्या बरोबर कष्टकर्यांच्या वेदना मांडन्याचा सातत्याने प्रयत्न डॉक्टरांनी केला आहे.यामुळे अनेकांना न्याय मिळाला आहे.व अनेकांचे भले झाले आहेत.हे कशामुळे तर राजकारणात असूनही आपली संवेदनशीलता जीवंत ठेवण्याच्या माणसाकडे माणूस म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन.विचारांवर सातत्याने केलेले प्रेम,माणसे जोडण्याचा केलेला प्रयत्न.कोणीही माणूस वाईट नाही तर माणूस जो वागतो तर तो त्याच्या परिस्थितीचा परिणाम असतो हे लक्षात घेवून परिस्थिती बदलण्यासाठी हाताला हात देणारा हा माणूस आहे.त्यामुळे राजकारणाच्या सिमेपलिकडे त्यांना सर्वच राजकीय पक्षात त्यांचे अनेक मित्र आहे. स्व;ताचा वैद्यकिय व्यवसाय असतांना आणि तिथे उपचार करतांना ईश्वर सेवा करण्याचा आनंद घेतांना योग्य निदान करण्याचा हतखंडा होता त्यामुळे त्यांच्याकडे रुग्णांची असलेली रीघ आजही सातत्याने टिकून आहे.त्यामुळे हा माणूस वैद्यकिय क्षेत्रातील सर्जन असला तरी सामाजीक क्षेत्रातील लोकसर्जन आहे हे ही खरेच.
शब्दांकन-संदीप वाकचैारे