काळे गट

नगरसेवक असतांना कामे केली नाही आता उपोषणाचा ईशारा निवडणुकांचे संकेत समजायचे का?

नगरसेवक असतांना कामे केली नाही आता उपोषणाचा ईशारा निवडणुकांचे संकेत समजायचे का?

नगरसेवक असतांना कामे केली नाही आता उपोषणाचा ईशारा निवडणुकांचे संकेत समजायचे का?

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२५ :- तुम्ही पाच वर्ष सत्ता असतांना देखील काहीच कामे केली नाही हे प्रभागातील नागरिकांना माहित आहे आणि तुमच्या मनाला देखील चांगलेच ठसत आहे याची आम्हाला जाणीव आहे.आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार संपूर्ण कोपरगाव शहरासह प्रभाग क्रमांक एक मधील सुख शांती नगर, समता नगर या ठिकाणी विकासकामे सुरु असतांना तुमचा उपोषणाचा ईशारा कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुका जवळ आल्याचे संकेत समजायचे का? असा तिरकस सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शैलेश साबळे यांनी प्रभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविकेच्या पुत्राला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात विचारला आहे.

जाहिरात

 दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे असे म्हटले आहे कीकोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक एक मधील विकासकामे मार्गी लागावी यासाठी प्रभागातील मतदारांनी तुम्हाला मोठ्या विश्वासाने निवडून देवून कोपरगाव नगरपरिषदेत पाठविले. मात्र पाच वर्ष सत्ता असतांना देखील काहीच विकास कामे केली नाही हे प्रभागातील जनतेला माहित आहे.आ. आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार संपूर्ण कोपरगाव शहरासह प्रभाग क्रमांक एक मधील सुख शांती नगर, समता नगर या ठिकाणी विविध विकासकामे सुरु असतांना तुम्ही विकासकामे व्हावेत यासाठी कोपरगाव नगरपालिकेला उपोषणाचा ईशारा देवून जनतेला वेड्यात काढण्याचा करीत असलेला प्रयत्न केविलवाणा असला तरी जनता तुमच्या ढोंगाला फसणार नाही.

जाहिरात आत्मा

तुम्हाला सत्ताधारी नगरसेवक होण्याची संधी मिळाली असतांना तुम्हाला प्रभाग क्रमांक एकच्या समस्या सोडविता आल्या नाही. त्या काळात जर तुम्हाला समस्या सोडविता आल्या असत्या तर आज तुम्हाला अपयश झाकण्यासाठी नगरपरिषदेला दोष देवून उपोषण करण्याचा ईशारा देण्याची वेळ तुमच्यावर आली नसती हे प्रभागातील जनतेला माहित आहे. कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुका पार पडून आज जवळपास आठ वर्षाचा कालावधी पूर्ण होत आला आहे. या आठ वर्षात आजच आपल्याला प्रभाग क्रमांक एकच्या समस्या दिसायला लागल्या हे प्रभागातील जनतेचे परम भाग्यच म्हणावे लागेल. तुम्ही आपणच कसे नागरिकांचे पालनहार आहोत हे दाखवून देत नागरिकांना जसे काही समजतच नाही हा तुमचा गोड गैरसमज मनातून काढून टाका, कारण तुम्ही जेवढे समजता तेवढी जनता दुधखुळी मुळीच राहिलेली नाही.

जाहिरात

कोपरगाव शहराचा झालेला विकास कोणामुळे झाला व भविष्यात कोणामुळे होणार आहे हे शहरातील जनतेने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत आ.आशुतोष काळे नावाच्या आधुनिक भगीरथाला ऐतिहासिक मताधिक्य देवून सिद्ध केले आहे. आ. आशुतोष काळे यांनी प्रभाग क्र. ०१ साठी १.६० कोटी निधी दिला असून त्या निधीतून होणारी विकासकामे देखील लवकरच सुरु होणार आहे. याची कुणकुण लागल्यामुळे तुम्ही उपोषणाचा ईशारा देवून जनतेला वेड्यात काढत आहात.

जाहिरात

मात्र जनता हुशार असून त्यांना खरं काम करणारा कोण आणि बतावण्या करणारा कोण याची उत्तम समज आहे. त्यामुळे तुम्ही कितीही खोटा कळवळा दाखवत असाल तरी तुम्ही आठ वर्षात प्रभागाच्या विकासाकडे लक्ष दिले असते तर तुमच्यावर हि वेळ नक्कीच आली नसती हे प्रभागातील प्रत्येक नागरिक जाणून आहे. त्यामुळे येत्या काळात जनता कोणाच्या पाठीशी उभी राहणार याचे उत्तर तुम्हाला लवकरच मिळणार असल्याचे शैलेश साबळे यांनी प्रभाग क्रमांक १ च्या माजी नगरसेविकेच्या पुत्राला दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून सांगितले आहे. कोपरगाव शहराच्या प्रभाग क्रमांक एक मधील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन व भूमिगत गटाराची सुरु असलेली विकासकामे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे