ग्रामपंचायतीला क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा माजी सरपंच आभाळे यांनी केला सन्मान
ग्रामपंचायतीला क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा माजी सरपंच आभाळे यांनी केला सन्मान
मढी खुर्द ग्रामपंचायतीला क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा माजी सरपंच आभाळे यांनी केला सन्मान
कोपरगाव विजय कापसे दि १८ जानेवारी २०२५– कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील वैशाली प्रमोद आभाळे या परिसरातील समाजकारण तसेच राजकारणाद्वारे घराघरात पोहोचलेले नाव, सरपंच पदाच्या कालखंडानंतर आपल्या कार्यकक्षेचा विस्तार करत कोपरगाव तालुका स्तरावर त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.मढी (खुर्द) ग्राम पंचायत येथील सरपंच पद भूषविल्यानंतर . सद्यस्थितीत त्या कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
सध्या त्या सरपंच पदावर विराजमान नसल्या तरी आपल्या सरपंच पदाच्या कालखंडात केलेल्या कामाच्या जोरावर आजही पंचक्रोशीत त्यांना एक आदर्श महिला सरपंच म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची दखल घेऊन आमदार आशुतोष दादा काळे यांनी त्यांना कोपरगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे युवती तालुका अध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली या पदावर कार्यरत असताना त्यांनी परिसरातील महिलांचे अनेक प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. मढी (खुर्द) परिसरात सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक उपक्रमात त्या अग्रस्थानी असतात. समाजकारणाबरोबर राजकारण करत असताना आपल्या कामाद्वारे त्यांनी आपल्या कुटुंबाचा नावलौकिक हि जनमानसात वाढवला तसेच तो जपण्यासाठी त्या नेहमीच सतर्क असतात.
त्यांच्या कार्यक्षेत्रातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी दूर करण्यास त्या नेहमीच अग्रेसर असतात तसेच परिसरातील शासकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देण्यासाठी त्या नेहमीच तत्पर असतात नुकताच मढी (खुर्द) ग्रामपंचायतला क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत पुरस्कार मिळाल्याचे औचित्य साधून परिसरातील सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा त्यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात जाऊन सन्मान केला व ग्रामपंचायतला हा बहुमान मिळण्यात आरोग्य कर्मचारी यांच्या अनमोल सहकार्याबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त केली.
परिसरात नव्याने उभ्या राहत असलेल्या उपकेंद्र इमारतीचा,प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यात सिंहाचा वाटा होता. कोरोना काळातही त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाची दखल वेळोवेळी सर्वच पातळ्यांवर घेण्यात आली त्याकरिता त्यांना अनेक पुरस्काराननीही गौरविण्यात आले. राजकारण व समाजकारण करताना अशीच त्यांच्या हातून परिसरातील नागरिकांची सेवा घडत राहो ही आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त साईमय सदीच्छा सर्वच मान्यवरां कडून व्यक्त केली गेली तसेच सर्वांच्या वतीने त्यांच्या भावी कारकिर्दीस तसेच आयुष्यास शुभेच्छा देण्यात आल्या.