कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० प्रतिनिधी उपस्थित राहणार – अध्यक्ष राजेंद्र कोळपे
कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० प्रतिनिधी उपस्थित राहणार – अध्यक्ष राजेंद्र कोळपे
कोपरगाव विजय कापसे दि १९ जानेवारी २०२५: अहिल्यानगर जिल्ह्याला सहकाराचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्याला सहकाराची मोठी परंपरा असून आज ही सहकारातील राज्याचे व देशाचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्तिमत्व काका कोयटे यांच्या रूपाने कोपरगाव तालुक्याला लाभले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचा सहभाग महत्वपूर्ण असल्यामुळे तालुक्यातील सहकारी पतसंस्थांचे ७०० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचा विश्वास कोपरगाव तालुका नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजेंद्र कोळपे यांनी आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५ पूर्वतयारीसाठी कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींची बैठक समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या समता सहकार सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झालेल्या बैठकीत बोलतांना व्यक्त केले.
कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांवर अधिक जबाबदारीयुनो ने घोषित केलेले २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जगात विविध कार्यक्रम व उपक्रमांच्या माध्यमातून साजरे होत आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन ही शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद १२ देशातील आणि ३ राज्यातील सहकारी पतसंस्था प्रतिनिधींच्या उपस्थितीत सहकारात होत असलेल्या विविध बदलांचे आदान प्रदान करून उत्साहात संपन्न होणार आहे. राज्यातून सहकारी पतसंस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून कोपरगाव तालुक्यातील सहकारी पतसंस्थांवर अधिक जबाबदारी असल्यामुळे त्यांनी देखील या परिषदेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.काका कोयटे, अध्यक्ष